आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asian Games News In Marathi, Divya Marathi, Asia Continant

इंचियोनमध्ये पोहोचली आशियाई स्पर्धेची मशाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - आशियाई स्पर्धेचे काउंटडाऊन सुरू झाले असून शुक्रवारपासून या स्पर्धेला अधिकृतरीत्या सुरुवात होईल. दरम्यान, आशिया खंडातील देशांचा ६ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आशियाई स्पर्धेची मशाल दक्षिण कोरियातील यजमान शहर इंचियोनमध्ये पोहोचली आहे.
या मशालीचा शेवटचा टप्पा शुक्रवारी पूर्ण होणार आहे. याच दिवशी स्पर्धेचे उद्घाटन होणार असून ‘गंगनम स्टाइल’ नृत्य प्रसिद्ध करणारा लोकप्रिय गायक साई आिण चीनचा पियानोवादक लांग लांग यात आपली कला सादर करणार आहे.

दरम्यान, आिशयाई स्पर्धेतील फुटबॉल खेळ प्रकाराला रविवारपासून सुरुवात झाली अाहे. याच्या पुरुष गटात गतवेळचा विजेता जपानने कुवेतला मात दिली. जपानला इराकविरोधात दुसरा सामना खेळावयाचा आहे. तसेच यजमान दक्षिण कोरियाच्या महिला संघाचा भारताशी सामना होईल. दुसरीकडे, उत्तर कोरियाच्या महिला संघाने व्हिएतनामचा ५-० ने पराभव केला. आिशयाई स्पर्धेसाठी चीनने सर्वाधिक ९०० खेळाडूंचा संघ पाठवला आहे.