( छायाचित्र: कोरिया व चीनच्या खेळाडूंची चुरस )
इंचियोन - भारतीय महिला संघापाठोपाठ आशियाई स्पर्धेत दमदार सुरुवात करण्याचा पुरुष फुटबाॅल संघाचा प्रयत्न सपशेल अपयशी राहिला. सलामी सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघाची स्पर्धेत निराशाजनक सुरुवात झाली. संयुक्त अरब अमिरातने जी गटातील
आपल्या पहिल्या सामन्यात भारतावर ५-० अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला.
अल काथेरीने (१३, १५, ६४ मि.) केलेल्या शानदार गाेलच्या बळावर यूएईने सामना जिंकला. बंडार माेहंमद (१९ मि.) व भारताच्या संदेश झिदान (८२ मि.) यांनी यूएईच्या विजयात प्रत्येकी एका गाेलचे याेगदान िदले.
दमदार सुरुवात करताना यूएई संघाने १३ व्या मनििटाला १-० ने आघाडी मिळवली. अल काथेरीने संघाकडून गाेलचे खाते उघडले. त्यानंतर त्याने दाेनच मनििटांत संघाच्या आघाडीला २-० ने मजबूत केले.
उत्तर कोरियाचा विजय
उत्तर कोरिया संघाने एफ गटात चीनवर ३-० ने मात केली. हो जीन सिम (१० मि.), साे क्याेंग जीन (४८ मि.) आणि ह्याेक चाे री (५९ मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करून संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. दरम्यान, चीन संघाने लढतीत गाेलचे खाते उघडण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले. मात्र, या संघाच्या खेळाडूंना समाधानकारक यश मिळवता आले नाही.