आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Asian Games News In Marathi, Inchoan, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंचियोन एशियाड : जितूचा पहिल्याच दिवशी सुवर्णावर नेम, श्वेताला कांस्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - एशियाडच्या पहिल्याच दिवशी भारताने नेमबाजीत दोन पदके जिंकली. पहिले कांस्य, दुसरे सुवर्ण. श्वेता चौधरीने १० मी. एअर पिस्टलमध्ये कांस्य पटकावले. अडीच तासांनी जितू रॉयने ५० मी. एअर पिस्टलमध्ये सुवर्ण जिंकले. जूननंतर त्याचे हे सहावे पदक आहे. यात २ सुवर्णांचा समावेश आहे.
श्वेता चौधरी : १० मी. एअर पिस्टल | स्कोअर : १७६.४
एक्स्ट्रा पिस्टलने पदकावर नेम
श्वेताचे नेहमीचे पिस्टल तीन दिवसांपासून द. कोरियाच्या सीमा शुल्क अधिका-यांकडे जमा होते. भारताकडून पाठवलेला नंबर तिच्या पिस्टलच्या नंबरशी जुळत नव्हता. यामुळे अधिका-यांनी ते पिस्टल दिले नाही. शेवटी तिला अतिरिक्त पिस्टलने खेळावे लागले.
२८ वर्षांनी मिळणार बॅडमिंटनचे पदक
महिला बॅडमिंटन संघ सेमीफायनलमध्ये. जिंकल्यास सुवर्ण, हरल्यास कांस्य मिळणार. १९८६ नंतर बॅडमिंटनमध्ये पदक मिळेल. महिला एकेरी स्क्वॅशमध्येही पदक निश्चित आहे.
भारोत्तोलन व ज्युडोत पराभव | राष्ट्रकुलमधील सात पदक विजेते- सुखेन डे, मीरा चानू, संजिता चानू (भारोत्तोलन), सुशील देवी, नवजोत चाना व कल्पना देवी (ज्युडो), मलायका गोयल (नेमबाजी) स्पर्धेबाहेर {आज नेमबाजी, स्क्वॅश व बॅडमिंटनमध्ये पदकाची आशा.
भारत सहाव्या स्थानी
देश सुवर्ण रौप्य कांस्य
कोरिया ०५ ०५ ०३
चीन ०५ ०१ ०५
मंगोलिया ०२ ०१ ०५
कजाकिस्तान ०२ ०० ०३
जपान ०१ ०४ ०३
भारत ०१ ०० ०१