आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Asian Games News In Marathi, Inchoan, South Korea, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रंगारंग कार्यक्रमाने क्रीडाज्योत प्रज्वलित; आशियाई स्पर्धेला सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाने दक्षिण कोरियात शुक्रवारी क्रीडाज्योत प्रज्वलित करून मोठ्या थाटात १७ व्या आशियाई स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. दोन चिमुकल्यांच्या हस्ते ही क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. तब्बल चार तास रंगलेल्या उद्घाटन सोहळ्यात कलाकारांनी नृत्याविष्काराच्या माध्यमातून स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडवले. या वेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या ४५ देशांच्या एक हजारपेक्षा अधिक खेळाडूंनी पथसंचलन करून उपस्थितांना शिस्तबद्धतेचा प्रत्यय आणून दिला. या वेळी भारतीय पथकातील महिला खेळाडूंनी साड्या परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

गंगनम स्टाइल नृत्याविष्कार
दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध रॅपर साईच्या विश्व विख्यात गंगनम स्टाइल नृत्याविष्काराने उद्घाटन सोहळ्याचा शेवट झाला. या वेळी उपस्थित चाहत्यांनी साईच्या ठेक्यावर नृत्य करून कलाकारांचा उत्साह वाढवला.

पुढे वाचा सरदारा सिंगचे दिमाखदार पथसंचलनाविषयी...