आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asian Games News In Marathi, Olympic, Divya Marathi

17 वे आशियाई स्पर्धा: महिला खेळाडू गाजवतील मैदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंचे आव्हान तगडे मानले जात नाही. मात्र, आशियात भारत मोठी शक्ती आहे. विशेषत: महिला खेळाडूंनी गत एशियन गेम्समध्ये भारताला सर्वाधिक ११ पदके (५ सुवर्ण) जिंकून िदली होती. इंचियोनमध्येसुद्धा या कामगिरीची आशा आहे. अॅथलेिटक्समध्ये भारताचे ५६ खेळाडू सहभागी होत आहेत. यात ३० महिला खेळाडू आहेत.

४७ सुवर्ण, १४१ पदके
अॅथलेिटक्समध्ये सर्वािधक अर्थात एकूण ४७ सुवर्णपदकांसाठी खेळाडू झुंजतील. यात एकूण १४१ पदके आहेत. कोणत्याही खेळातील ही सर्वािधक पदक संख्या आहे. लांब पल्ल्याची शर्यत, रिले शर्यत, थाळीफेकीत भारतीय खेळाडू सहभागी होतील.

पदकाचे दावेदार
विकास गौडा, प्रीजा श्रीधरन, सुधा िसंग, िटंटू लुका, अश्विनी, मनदीप कौर, एमआर पुवम्मा, सीमा अंतिल पुनिया, कृष्णा पुनिया, जोसेफ अब्राहम, ओमप्रकाश करहाना.

यांचे आव्हान
भारतासाठी चिनी खेळाडूंचे सर्वािधक मजबूत आव्हान असेल. जपान, कझाकिस्तान, उझ्बेिकस्तान, बहरीन आणि कतारचे खेळाडूही आव्हान सादर करतील.
१३ सुवर्ण (३६ पदके) मागच्या एशियन गेम्समध्ये चीनने मैदानी खेळात िजंकले होते.
७० सुवर्ण (२१९ पदके) भारताने एशियन गेम्सच्या मैदानी खेळात जिंकले आहेत.

४४ वर्षांपासून फुटबॉलमध्ये पदकाची प्रतीक्षा
भारताने १९५१ मध्ये पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत फुटबॉलमध्ये सुवर्ण िजंकले होते. जकार्ता (१९६२) येथे आपण पुन्हा चॅम्पियन बनलो. आठ वर्षांनंतर बँकॉकमध्ये कांस्य िमळाले. मात्र, तेव्हापासून आपल्याला पदकाची प्रतीक्षा आहे.