(पाकिस्तानी खेळाडूला नॉकआऊट केल्यानंतर प्रशिक्षकांसमवेत शिव थापा)
इंचियोन - 17 व्या आशियाई स्पर्धेतील 7 व्या दिवशी भारताची चांगली सुरुवात झाली आहे. पुरष नेमबाजांनी भारताला रोप्य पदक मिळवून दिले. तर बॉसिंगमध्ये 56 किलो वजनी गटामध्ये भारताच्या शिव थापाने पाकिस्तानच्या नादिरला नॉकआउट केले. या विजयासह थापा उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल झाला आहे.
सानिया विजयी
योरुमल टेनिस कोर्टवर भारताच्या
सानिया मिर्झा आणि प्रार्थना गुलाबरा या जोडीने मंगोलियाच्या बोलोर एंखबयर आणि डी गोतोव यांना 6-0, 6-0 ने पराभूत केले. सानिया आणि प्रार्थनाने या विजयाबरोबरच उपांत्यूपूर्व फेरी गाठली आहे.
स्क्वॅशमध्ये सुवर्ण पदकाची अपेक्षा
भारताच्या दीपिका पल्लिकल आणि जोश्ना चिनप्पा यांनी सेमीफायनल सामन्यात दक्षिण कोरियाच्या खेळाडूंना 2-0 ने पराभूत केले. या विजयामुळे त्यांनी सुवर्णपदकाच्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे.
जोत्स्नाने मेजबान दक्षिण कोरियाच्या पार्क युनॉकला 11-6, 13-11, 11-8 पराभूत केले. तर दीपिकाने सॉन्ग सुन्मीला 11-4, 11-5, 8-11, 11-5 अशा फरकाने पराभूत केले.
रौप्यने झाली सुरुवात
पुरुषांच्या सेंटर फायर पिस्तूल सांघिक प्राकरात भारतीय अॅथलेटपटू दुस-या स्थानी आहेत. पेंगा तमंग, गुरुप्रीत सिंह आणि विजय कुमार यांनी रौप्य कामगिरी केली आहे.या पदकासह भारताच्या झोळीत एकूण 16 पदके झाले आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, आशियाई खेळातील ताजी छायाचित्रे..