आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asian Shooting Copitition Vijaykumar Gold Winner

आशियाई नेमबाजी स्पर्धात भारताच्या विजयकुमारचा ‘सुवर्ण’ वेध!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोहा - भारताचा आघाडीचा नेमबाज विजयकुमार याने आशियाई नेमबाजी स्पर्धेतील स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात अव्वल स्थान गाठत सुवर्णपदकाचा वेध घेतला. चौथ्या दिवशी चमकदार कामगिरी करत 600 पैकी 572 गुण मिळवणाºया विजयकुमारच्या रूपाने भारताला पाचवे सुवर्णपदक मिळाले. मात्र ऑलिम्पिकचा कोटा पूर्ण करण्यामध्ये शुक्रवारी भारताच्या नेमबाजांना अपयश आले.
दोहा येथे सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत सैन्य दलात असलेल्या भारताच्या विजयकुमारने शानदार कामगिरी करून दाखवली. रॅपिड फायरमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करत विजयकुमारने आधीच ऑलिम्पिक कोटा पूर्ण केलेला आहे. त्यामुळे स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात त्याने आपले नशीब अजमावले. चीनच्या योगंडे जीनसोबत तोडीस तोड कामगिरी करून विजयकुमारने संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले आहे. विजयकुमारने 17 वेळा 10 गुणांवर अचूक नेम साधला, तर जीनला केवळ 15 वेळा यामध्ये यश मिळाले. त्यामुळे जीनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर जपानच्या तोमोहिरो किदा याने कांस्यपदकाचा बहुमान पटकावला. 552 गुणांची कमाई करणारा भारताचा समशेर जंग 16 व्या स्थानावर राहिला व महावीरला 24 वे स्थान मिळाले. सांघिकमध्ये भारताच्या पदरात निराशा पडली. सांघिकमध्ये चीनने सुवर्ण, थायलंडने रौप्य व जपानला कांस्यपदक मिळाले. दोन दिवसांपासून निराशाजनक कामगिरी करणाºया भारतीय नेमबाजांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विजयकुमारचा सुवर्णवेध प्रेरणा देणारा ठरणार आहे.