आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Asian Trophy Hockey Competition Started From Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशिया चषक हॉकी स्पर्धा आजपासून रंगणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आशिया चषक हॉकी स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत सरदारसिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघ खेळणार आहे. दोन वेळची चॅम्पियन भारतीय हॉकी टीम शनिवारी स्पर्धेत ओमानविरुद्धच्या सामन्यातून विजयी मोहिमेला सुरुवात करेल. ही स्पर्धा 24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान मलेशियातील इपोह येथे होणार आहे. दानिश मुज्तबा, एसव्ही सुनील, गुरविंदरसिंग चांडी आणि आकाशदीप या दुखापतग्रस्त चार खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ स्पर्धेत सहभागी झाला आहे. यामध्ये निकिन थिमय्या व रमणदीपसिंगचा समावेश आहे. डिफेंडर अमित रोहिदासलाही संघात संधी मिळाली आहे.

भारतीय संघ : गोलरक्षक : पी. आर. श्रीजेश (उपकर्णधार), पी. टी. राव. डिफेंडर : व्ही. आर. रघुनाथ, रूपिंदरपालसिंग, अमित रोहिदास, कोथजिसिंग, वीरेंद्र लाक्रा, गुरमितसिंग. मिडफील्डर : सरदारसिंग (कर्णधार), मनप्रीतसिंग, चिंगलेसनासिंग, धर्मवीरसिंग, एस.के. उथप्पा. फॉरवर्ड : रमणदीपसिंग, नितीन थिमय्यया, मालकसिंग, निकिन थिमैया.

दोन वेळा भारत चॅम्पियन
भारताने 2003 मध्ये आशिया चषक जिंकला होता. या संघाने अंतिम सामन्यात पाकला 4-2 ने पराभूत केले होते. त्यानंतर 2007 मध्ये भारताने सलग दुस-यांदा चषकावर नाव कोरले. यजमान भारताने घरच्या मैदानावर बलाढ्य कोरियाला 7-2 ने धूळ चारली होती.

विश्वचषक प्रवेशाची भारताला शेवटची संधी
वर्ल्डकप तिकीट मिळवण्याची भारताला ही शेवटची संधी आहे. यापूर्वी रोट्टरडॅम येथे भारताला अपयश आले. त्यामुळे आशिया चषक जिंकून आगामी विश्वचषकातील प्रवेश निश्चित करण्याचे भारतीय संघाचे एकमेव लक्ष्य आहे. ही स्पर्धा हॉलंडच्या हेग येथे पुढच्या वर्षी होणार आहे.

चार वेळा भारताला उपविजेतेपद
भारताला तब्बल चार वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. 1982, 1985 1989 आणि 1993 मध्ये झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय हॉकी संघाचा पराभव झाला होता.

आजारी सरदार खेळणार नाही!
आशिया चषकात विजयी मोहिम सुरु करण्याच्या तयारी असलेल्या भारताचा कर्णधार सरदार सिंग तापाने फणफणला आहे. त्यामुळे ओमानविरुद्ध सामन्यात त्याचे खेळणे अद्याप निश्चित नाही.