आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेन्नई - येथे चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत सोमदेव देववर्मन, युकी भांबरी, सनमसिंगकडून यजमान भारतीय संघाला चांगल्या खेळीची आशा आहे. भारताचा एकेरीतील सुपरस्टार सोमदेव सलामीचा सामना क्वालिफायर खेळाडूसोबत खेळणार आहे. दुसरीकडे भारताचा युवा खेळाडू युकी भांबरी आणि जीवन नेदुनचेझियन या दोघांचा पहिल्या फेरीतील मार्ग खडतर आहे. या युवा खेळाडूंना सलामी सामन्यात तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
वावरिंका खेळणार
अव्वल मानांकित स्टान्सिलास वावरिंका हा चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. वावरिंकाशिवाय दुसरा मानांकित मिखाइल योज्नी (रशिया), तिसरा मानांकित फेबियो फोगनिनी (इटली),चौथा मानांकित बेनोइट पेयरे (फ्रान्स) देखील स्पर्धेत नशीब आजमावणार आहेत. या अव्वल खेळाडूंचा उपांत्यपूर्व लढतीपर्यंतचा प्रवास अधिक सोपा आहे.
कुरेशी-बोपन्नाला अव्वल मानांकन
भारताचा रोहन बोपन्ना आणि पाकिस्तानचा ऐसाम-उल-कुरेशी ही जोडी पुरुष दुहेरीत नशीब आजमावणार आहे. या जोडीला दुहेरीत अव्वल मानांकन मिळाले आहे. तब्बल दोन वर्षांनंतर हे दोघे एकत्र खेळत आहेत. या जोडीचा सामना गतविजेत्या बेनोइट पेयरे आणि वावरिंकाशी होईल. दुसरीकडे दिग्गज खेळाडू लिएंडर पेस आपला नवा जोडीदार फेबियो फोगनिनीसोबत दुहेरीत खेळणार आहे. याशिवाय रामकुमार रामनाथन आणि श्रीरामने वाइल्ड कार्डद्वारे स्पर्धेत प्रवेश मिळवला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.