आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चमिंडा वास, अट्टापट्टू श्रीलंका क्रिकेटचे प्रशिक्षक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंका- श्रीलंका क्रिकेट मंडळाने काही अंतर्गत बदल करताना माजी फलंदाज मर्वन अट्टापट्टू याची सहाय्यक प्रशिक्षक आणि चमिंडा वासला वेगवान गोलंदाजीचा प्रशिक्षक म्‍हणून नेमले आहे.

माजी कर्णधार अट्टापट्टू (42)ला बढती मिळाली असून तो पूर्वी फलंदाजीचा प्रशिक्षक होता. ग्रॅहम फोर्डकडून तो एक मार्चपासून पदभार घेईल. चंपाका रामनायकेऐवजी वास आता वेगवान गोलंदाजीचा प्रशिक्षक म्‍हणून काम पाहील.