आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अ‍ॅथलेटिको’ घडवणार भावी भारतीय फुटबॉलपटू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंडियन सुपर लीग या फुटबॉल लीगच्या अंतिम लढतीच्या पूर्वसंध्येला आज मुंबईत, अ‍ॅथलेटिको द कोलकाता व ला लिगा चॅम्पियन क्लब अ‍ॅथलेटिको द माद्रिद यांनी संयुक्तपणे भारतातील तळागाळातील फुटबॉल गुणवत्ता विकसित करण्याचा कार्यक्रम जाहीर केला. त्या वेळी अ‍ॅथलेटिको माद्रिदचे अधिकारी, कोलकाता संघाचा सहमालक माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली व स्पेनच्या राष्ट्रीय संघाचा खेळाडू मिडफील्डर जॉर्ज मेरोडिओ ऊर्फ ‘कोके’ आदी मान्यवर उपस्थित होते.

अ‍ॅथलेटिको द माद्रिद हा स्पेनचा फुटबॉल क्लब शतकाहून अधिक वर्षांची फुटबॉल परंपरा जपलेला क्लब आहे. ‘कोके’ या मधल्या फळीत खेळणा-या खेळाडूने आपली संपूर्ण कारकीर्दच या क्लबसाठी अर्पण केली आहे. स्पेनच्या २०१३च्या युरोपियन फुटबॉल लीग जिंकणा-या संघाचा प्रमुख खेळाडू असलेला आणि २०१४ च्या स्पेनच्या विश्वचषक संघाचा खेळाडू असलेला ‘कोके’ त्याच्या चेंडू ‘पास’ करण्याच्या कौशल्यामुळे जागतिक प्रसिद्धी पावलेला खेळाडू आहे. या ‘कोके’च्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅथलेटिको व कोलकाता संघ मार्गक्रमण करीत आहे. या दोन क्लबने संयुक्तपणे भारतीय फुटबॉल गुणवत्तेला आकार देण्याचा कार्यक्रम शनिवारी जाहीर केला.
भारतातील १५ ते २० गुणवत्तावान खेळाडूंची या प्रशिक्षण योजनेसाठी निवड करण्यात येणार आहे. १२ ते १३ वयोगटातील मुलींचीही प्रशिक्षणाखाली निवड करण्यात येईल. इंडियन सुपर लीग व माद्रिदचा क्लब मिळून या प्रशिक्षणार्थींची निवड करतील. निवड झालेल्या खेळाडूंना माद्रिद (स्पेन) येथे प्रशिक्षण देण्यात येईल. या ठिकाणी निवड झालेल्याना उत्तम प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल.

प्रशिक्षण कार्यक्रम असा असेल
-१३ वर्षांखालील वयोगटातील प्रशिक्षणार्थी.
-३ ते ४ तासांचे प्रशिक्षण, दरम्यान अल्पोपाहार.
-‘फिफा’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मार्गदर्शन.
-प्रत्येक सत्रात तंत्रशुद्ध प्रशिक्षणाचे धडे.
-मिलान संघ, सॉल्ट लेक
प्रशिक्षक : कृष्णेडू रॉय, प्रशिक्षणार्थी : ३५ मुले
- ईस्ट कोलकाता डिस्ट्रिक्ट
प्रशिक्षक : मानस भट्टाचार्य, प्रशिक्षणार्थी: २७ मुले
- सेंट्रल ईस्ट कोलकाता
प्रशिक्षक : बस्ताब रॉय, प्रशिक्षणार्थी : २५ मुले
- बंदेल स्पोर्टिंग क्लब
प्रशिक्षक : मानस भट्टाचार्य, प्रशिक्षणार्थी : ९१ मुले
-खर्द स्पोर्टिंग असो.
प्रशिक्षक : अरिंदम देब, प्रशिक्षणार्थी : ८५ मुले