आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Athletic Club Bilbao 3 0 Malaga News In Divya Marathi

ला लीग : मलगाविरुद्ध अँथलेटिको क्लबचा विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिल्बावो - अँथलेटिको क्लबने ला फुटबॉल लीगमध्ये शानदार एकतर्फी विजय मिळवला. या टीमने लढतीत मलगा सीएफचा 3-0 अशा फरकाने पराभव केला. अँडिरिझे (4, 62 मि.) याने केलेल्या गोलच्या बळावर अँथलेटिकोने सामना जिंकला. यात हेर्रेराने (62 मि.) एका गोलचे योगदान दिले. अँथलेटिको क्लबचा लीगमधील हा 18 वा विजय ठरला. विजयासह या क्लबने गुणतालिकेत 62 गुणांसह चौथ्या स्थानी धडक मारली. दुसरीकडे 11 व्या स्थानी असलेल्या मलगा सीएफला 15 व्या पराभवाला सामोरे जावे लागले.

सामन्याच्या अवघ्या चार मिनिटांत अँडिरिझेने अँथलेटिको क्लबकडून गोलचे खाते उघडले. या गोलच्या बळावर क्लबने लढतीत 1-0 ने आघाडी घेतली. या गोलने अँथलेटिकोला लढतीत आपला दबदबा निर्माण करता आला. दरम्यान, मलगाने लढतीत बरोबरी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, मध्यंतरापर्यंत या टीमला गोलचे खाते उघडता आले नाही. त्यानंतर 46 व्या मिनिटाला अँडिरिझेने वैयक्तिक आणि टीमकडून दुसरा गोल केला. या गोलसह त्याने अँथलेटिकोच्या आघाडीला 2-0 ने मजबूत केले.
पिछाडीवर पडलेल्या मलगाने गोलसाठी केलेले अनेक प्रयत्न अपयशी ठरले.