आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Athletico Madrid Wins In Spanish Football League

स्पॅनिश फुटबॉल लीग : कोस्टा, व्हिलाचे गोल; अ‍ॅथलेटिको माद्रिद विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रॅनडा- अ‍ॅथलेटिको माद्रिदने स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये विजय मिळवला. या टीमने यजमान ग्रॅनडा सीएफला घरच्या मैदानावर 2-1 ने धूळ चारली. माद्रिदचा स्पर्धेतील हा दहावा विजय ठरला. याच्या बळावर माद्रिदने 20 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले. आता रिअल माद्रिदची 13 गुणांसह तिस-या स्थानी घसरण झाली. लियोनेल मेसीचा बार्सिलोना संघ (31 गुण) अव्वल स्थानी आहे.

डियागो कोस्टा (38 मि.) आणि व्हिला (78 मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर अ‍ॅथलेटिको माद्रिदने सामना जिंकला. यजमान टीमकडून लाघालोने शेवटच्या मिनिटाला केलेला एकमेव गोल व्यर्थ ठरला.
पाहुण्या माद्रिदने 38 व्या मिनिटाला सामन्यात गोलचे खाते उघडले. त्याने पेनल्टी कॉर्नरवर सुरेख गोल करून माद्रिदला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. या गोलच्या बळावर पाहुण्या टीमने घेतलेली आघाडी मध्यंतरापर्यंत कायम ठेवली.
त्यानंतर दुस-या हाफमध्ये व्हिलाने 78 व्या मिनिटाला माद्रिदच्या आघाडीला 2-0 ने मजबूत केले. त्याने पेनल्टी कॉर्नरवर हा गोल केला होता.

गेटाफे सीएफचा एकतर्फी विजय
दुसरीकडे गुणतालिकेत सहाव्या स्थानी असलेल्या गेटाफे सीएफने सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. या टीमने सामन्यात विल्लारेल सीएफला 2-0 ने पराभूत केले. मारिसा (5 मि.) आणि साराबिया (90 मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर गेटाफेने सामना जिंकला.