आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Atletico Close On Surprise La Liga Triumph After Getafe Win News In Divya Marathi

अ‍ॅटलेटिको माद्रिद विजयी; कोस्टा जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्सिलोना - अ‍ॅटलेटिको माद्रिदचा स्टार स्ट्रायकर दिएगो कोस्टाने दुसरा गोल लगावत संघाच्या विजयात मोलाची भर घातली. मात्र, या गोलवेळी त्याच्या पायाला गोलपोस्ट लागल्याने रक्तबंबाळ पायासह त्याला मैदान सोडावे लागले.

ला लिगामध्ये फॉर्मात असलेल्या अ‍ॅटलेटिको माद्रिदच्या संघाने या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानासह तीन गुणांची आघाडी पटकावलेली आहे. आता केवळ पाच सामने खेळणे बाकी असून अव्वल स्थान अखेरपर्यंत कायम राखल्यास तब्बल 18 वर्षांनंतरची ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरणार आहे.

कोस्टाची जखम नाही गंभीर
गेटाफेविरुद्ध खेळताना अ‍ॅटलेटिकोच्या खेळाडूंनी सांघिक खेळाचे अप्रतिम दर्शन घडवत आघाडी घेतली, तर उत्तरार्धात 84 व्या मिनिटाला दिएगो कोस्टाने स्पर्धेतील स्वत:चा 26 वा, तर संघाचा दुसरा गोल लगावून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. मात्र त्या गोलच्या प्रयत्नात गोलपोस्टचा रॉड लागल्याने पाय रक्तबंबाळ झाला असला तरी ही दुखापत फार गंभीर नसल्याचे त्याच्या संघसहकार्‍यांनी म्हटले आहे. अ‍ॅटलेटिकोच्या गॉडीनने 40 व्या मिनिटाला पहिला गोल लगावत विजयी अभियानाला प्रारंभ केला.