आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Atletico Madrid Stun Barcelona To Reach UEFA Champions League Semi finals

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा : बार्सिलोनाला पराभवाचा धक्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - कर्जाच्या संकटातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्या अ‍ॅटलेटिको माद्रिदच्या संघाने चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत बार्सिलोनासारख्या दिग्गज संघाला धक्का देत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

वयाच्या आठव्या वर्षापासून अ‍ॅटलेटिको माद्रिद क्लबचा हिस्सा असलेल्या कोके या खेळाडूने केलेला एकमेव गोल सामन्यात निर्णायक ठरला. बार्सिलोनासारख्या दिग्गज संघाला अखेरपर्यंत झुंजवत ठेवत माद्रिदने विजय मिळवला. या विजयामुळे माद्रिद 40 वर्षांत प्रथमच चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला आहे. अ‍ॅटलेटिकोला उपांत्य फेरीत पोहोचणे 40 वर्षांनी शक्य झाले असे प्रशिक्षक दिएगो सायमन यांनी सांगितले.

बायर्नची घोडदौड सुरूच
बायर्न म्युनिकने किताब स्वत:कडे राखण्यासाठीची घोडदौड सुरूच ठेवली आहे. बायर्नने मँचेस्टर युनायटेडला 3 -1 ने पराभूत करून उपांत्य फेरी गाठली आहे.

पाचव्या मिनिटाला गोल
अ‍ॅटलेटिको माद्रिदच्या कोकेने सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला गोल नोंदवत बार्सिलोनावर आघाडी घेतली. कोकेचा हा स्पर्धेतील पहिलाच गोल निर्णायक ठरला.