आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Atletico Madrid Win Latest Sports News In Marathi

अ‍ॅथलेटिको माद्रिद, बायर्न विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - जबरदस्त फॉर्मात असलेल्या बायर्न म्युनिच आणि अ‍ॅथलेटिको माद्रिदने इंग्लिश फुटबॉल प्रीमियर लीगची उपांत्यपूर्व फेरी गाठली. बायर्न म्युनिचने अंतिम 16 मध्ये आर्सेनलचा रंगतदार लढतीत 2-0 ने धुव्वा उडवला. या विजयासह म्युनिचने स्पर्धेतील आपली विजयी मोहीम अबाधित ठेवली.
आर्सेनलने सामन्यात दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, म्युनिचच्या खेळाडूंमुळे प्रतिस्पर्धी टीमचा प्रयत्न शेवटच्या मिनिटांपर्र्यंत यशस्वी होऊ शकला नाही. ही रोमांचक लढत मध्यंतरापर्यंत शून्य गोलने बरोबरीत खेळवली गेली. अखेर, 54 व्या मिनिटाला बायर्न म्युनिचने लढतीत गोलचे खाते उघडले होते.
डिएगोचा गोल; माद्रिद विजयी
डिएगो कोस्टाने (83मि.) केलेल्या शानदार गोलच्या बळावर अ‍ॅथलेटिको माद्रिदने रोमांचक लढतीत 1-0 ने विजय मिळवला. या टीमने लढतीत एसी मिलानला धूळ चारली. या टीमला सामन्यात गोलचे खाते उघडण्यासाठी तब्बल 83 मिनिटांपर्यंत झुंज द्यावी लागली.