आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीपी चॅलेंजर टेनिस: रामकुमार दुस-या फेरीत दाखल, सोमदेव पराभूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँग- साकेत मिनेनीपाठाेपाठ भारताचा युवा खेळाडू रामकुमार रामनाथनने एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत मजल मारली. दुसरीकडे भारताचा स्टार साेमदेव देववर्मनला पराभवाचा सामना करावा लागला.
भारताचा रामकुमार अाणि तैपेईच्या यान बाई यांच्यात पुरुष एकेरीचा सलामी सामना रंगला हाेता. या वेळी तैपेईच्या खेळाडूने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये बाजी मारून अाघाडी घेतली. मात्र, दुसरा सेट जिंकून रामकुमारने लढतीत बराेबरी साधली. दरम्यान, तिसऱ्या सेटमध्ये रामकुमारने ४-१ ने अाघाडी घेतली असताना यानच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. अाता २० वर्षीय रामकुमारचा दुसऱ्या फेरीतील सामना साकेतशी हाेईल. भारताच्या साकेत मिनेनीने मंगळवारी जागतिक क्रमवारीत ८५ व्या स्थानावर असलेल्या रिचर्ड््स बेराकिसविरुद्ध सनसनाटी विजय संपादन केला हाेता.

सनमचा पराभव
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत सनम सिंगचा पराभव झाला. त्याला इंडाेनेशियाच्या ख्रिस्टाेफर रुंगकाटने पराभूत केले. इंडाेनेशियाच्या खेळाडूने ६-३, ६-४ अशा फरकाने शानदार विजय मिळवला. या पराभवासह सनमला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. मात्र, दुहेरीत त्याने साकेतसाेबत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

साेमदेवची निराशा
भारताच्या साेमदेव देववर्मनला पुरुष दुहेरीच्या सलामीला पराभवाचा सामना करावा लागला. साेमदेव अाणि डी वुला सामन्यात राडू अल्बाेट व थाॅमसनने ६-३, ३-६, १०-५ ने पराभूत केले.