आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युकीची विजयी सलामी; जखमी साकेत बाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तैपेई - भारताचा युवा खेळाडू युकी भांबरीने एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेतील अापल्या किताबाच्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. त्याने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत शानदार विजयी सलामी दिली. यासह त्याने दुसरी फेरी गाठली. दुसरीकडे भारताच्या साकेत मिनेमीला स्पर्धेतील अाव्हान कायम ठेवता अाले नाही. त्यामुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

भारताच्या साकेत मिनेमीला पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत जपानच्या हिराेकी माेरियाच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागले. सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याने सामन्यातून माघार घेतली. या वेळी जपानच्या खेळाडूने पहिल्या सेटमध्ये ५-२ अशी अाघाडी घेतली हाेती. त्यामुळे हिराेकीला विजयी घाेषित करण्यात अाले. यासह जपानच्या खेळाडूने दुसरी फेरी गाठली.
जागतिक क्रमवारीत २४४ व्या स्थानावर असलेला साकेत अाता पुरुष दुहेरीत युकी भांबरीसाेबत नशीब अाजमावणार अाहे. युकी अाणि साकेत ही जाेडी पुरुष दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार अाहे. त्यामुळे त्याला माेठी अाशा अाहे.
युकीचा राेमहर्षक विजय
जागतिक क्रमवारीत २१६ स्थानावर असलेल्या युकी भांबरीने पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात जपानच्या खेळाडूला धूळ चारली. त्याने युवा किबीचा पराभव केला. युकीने ६-१, ४-६, ६-३ अशा फरकाने विजयाची नाेंद केली. यासह त्याने दुसऱ्या फेरीत धडक मारली. मात्र, यासाठी त्याला एक तास ५३ मिनिटे झंुज द्यावी लागली. पहिल्या सेटवर बाजी मारून दमदार सुरुवात करणाऱ्या युकीला दुसऱ्या सेटवर अपयशाला सामाेरे जावे लागले. त्याला लय कायम ठेवता अाली नाही.