आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमदेव, महेश भूपती, पेसचे विजयी लक्ष्य, चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेला आजपासून सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- भारताचा एकेरीतील नंबर वन सोमदेव देववर्मन, अनुभवी खेळाडू लिएंडर पेस आणि आयपीटीएलचा जनक महेश भूपती घरच्या मैदानावर शानदार विजयाने नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सोमवारपासून नव्या वर्षातील एटीपीच्या चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतासह विदेशी खेळाडूंच्या सहभागानेही या स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन स्टॅनिसलास वांवरिकादेखील या स्पर्धेत नशीब आजमावणार आहेत. तो सातव्यांदा स्पर्धेत सहभागी झाला आहे.

या स्पर्धेच्या पुरुष एकेरीत सोनेरी यशासह अव्वल १०० मध्ये स्थान मिळवण्याचे सोमदेवचे लक्ष्य आहे. मात्र, यासाठी त्याला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याला स्पर्धेत कठीण ड्रॉ मिळाला आहे. या बलाढ्य खेळाडूंना सरळ सेटमध्ये धूळ चारून त्याला जेतेपदापर्यंतचा पल्ला गाठता येईल.
वावरिंकाला एकेरीच्या पहिल्या फेरीत पुढे चाल
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या वावरिंकाला पुरुष एकेरीच्या किताबाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्याला स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पुढे चाल (बाय) देण्यात आली आहे. त्यामुळे तो आता दुसऱ्या फेरीतील विजयाने जेतेपदाच्या आपल्या मोहिमेचा शुभारंभ करेल. ह्यमाझ्यासाठी चेन्नई हे अधिक महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेतील विजयाने मला नववर्षाची सुरुवात करण्याची संधी मिळते. येथील वातावरणाचाही मला मोठा फायदा होतो,ह्ण अशी प्रतिक्रिया वावरिंकाने दिली.
सोमदेवसमोर चीनचा येन
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामना भारताच्या सोमदेव देववर्मनसाठी आव्हानात्मक आहे. त्याला सलामी सामन्यात जागतिक क्रमवारीत ३८ व्या स्थानावर असलेल्या येन लूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. या सामन्यातील विजयासह जागतिक क्रमवारीत १३८ व्या स्थानावर असलेल्या सोमदेवला अजिंक्यपदाच्या मोहिमेला दमदार सुरुवात करता येईल. यासाठी त्याला सलामीच्या लढतीत मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. ह्यपहिली फेरी माझ्यासाठी फार कठीण आहे. तो सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. मात्र, त्याला सलामीला रोखण्याचा माझा प्रयत्न असेल. त्यासाठी मी कसून सराव केला आहे,ह्ण अशी प्रतिक्रिया सोमदेवने दिली.

भूपती-मिनेनीकडून आशा
आयपीटीएलचा जनक आणि दुहेरीचा अनुभवी खेळाडू महेश भूपती तब्बल मार्च २०१४च्या दीर्घ प्रतीक्षेनंतर टेनिस कोर्टवर परतत आहे. आता हा ४० वर्षीय टेनिसपटू साकेत मिनेनीसोबत पुरुष दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या जोडीचा सलामी सामना भारताच्या जीवन आणि एन. श्रीराम बालाजीशी होईल.

युकीचे स्वप्न भंगले
डेव्हिस चषक मिळवून देणारा युवा खेळाडू युकी भांबरीचे चेन्नई ओपनमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले. त्याला रविवारी पात्रता फेरीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्याला प्रशांतने १-६, ७-६, ६-३ अशा फरकाने पराभूत केले.