बोपन्ना-कुरेशीची आघाडी / बोपन्ना-कुरेशीची आघाडी

वृत्तसंस्था

Aug 12,2011 04:50:29 AM IST

माँट्रियल - मागील महिनाभरापासून विजयी पताका फडकवण्याची चमकदार कामगिरी करत असलेल्या इंडो-पाक एक्स्प्रेस रोहन बोपन्ना-कुरेशी या जोडीने एटीपी रॉजर्स चषकच्या तिस-या फेरीत धडक मारली आहे. पाचव्या मानांकित बोपन्ना-कुरेशी जोडीने आॅस्ट्रेलियन पाऊल हॅली-ब्रुनोला सरळ दोन सेटवर ६-४, ७-६(६) ने पराभवाची धूळ चारून दुसºया फेरीत विजय संपादन केला. पहिल्या फेरीत या जोडीला पुढ चाल मिळाली होती. त्यानंतर झालेल्या दुसºया फेरीच्या लढतीत या जोडीने शानदार विजय मिळवला.
आता बॉब-माइकशी सामना
बोपन्ना-कुरेशी या जोडीची लढत आता अव्वल मानांकित बॉब -माइकसोबत होणार आहे. पुरुष दुहेरीच्या विजेतेपदावरचे आव्हान राखून ठेवण्यासाठी या जोडीला कसून प्रयत्न करावा लागणार आहे.

पेस-भूपतीचे आव्हान संपुष्टात
एटीपी चषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाºया भारतीय टेनिसस्टार लिएंडर पेस-महेश भूपती या जोडीला पुरुष दुहेरीत पराभवाचा अनपेक्षित धक्का बसला. चेक गणराज्यचा टामस बेडरिक व जर्मनीचा मायेर या जोडीने ६-१, ७-६ ने बाजी मारून तिसºया मानांकित पेस-भूपती जोडीचे आव्हान संपुष्टात आणले. विम्बल्डन स्पर्धेत या जोडीला दुसºया फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला.

X
COMMENT