आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीपी वॉशिंग्टन ओपन टेनिस : मिलोस राओनिक उपांत्यपूर्व फेरीत; लेटन हेविट बाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - दुसर्‍या मानांकित मिलोस राओनिकने एटीपी वॉशिंग्टन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने एकेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या लेटन हेविटला सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली. त्याने लढतीत 7-6, 7-6 अशा फरकाने रोमहर्षक विजयाची नोंद केली.
पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. कॅनडाच्या राओनिकने लढतीत 27 ऐस मारून दोन वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियन हेविटचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. उपांत्यपूर्व फेरीत राओनिक आणि अमेरिकेचा स्टीन सामना रंगणार आहे.
इवो कालरेविचचे आव्हान संपुष्टात : क्रोएशियाच्या इवो कालरेविचचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याला अमेरिकेच्या जॉन्सनने पराभूत केले. त्याने 3-6, 7-6, 7-6 अशा फरकाने सामना जिंकला. नवव्या मानांकित इवोने लढतीदरम्यान एकूण 27 ऐस मारले. मात्र, त्याला विजयश्री खेचून आणता आली नाही.

अँडरसन अंतिम आठमध्ये
दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनने अंतिम आठमधील आपला प्रवेश निश्चित केला. त्याने अंतिम 16 मधील लढतीत ट्युनिशियाच्या मालेक जाजिरीला 6-3, 6-4 ने पराभूत केले. आता त्याच्यासमोर अमेरिकेच्या डोनाल्ड यंगचे तगडे आव्हान असेल. डोनाल्डने नुकतीच उजबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिनवर 6-3, 3-6, 6-3 ने मात केली.