आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ATP World Tour Finals: Novak Djokovic Takes Title After Roger Federer Pulls Out Injured

एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेत नोवाक योकोविकने जिंकला वर्ल्ड टूर किताब;

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- जगातील नंबर वन नोवाक योकोविक एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत चॅम्पियन ठरला. त्याने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या किताबावर नाव कोरले. ऐनवेळी फायनलमधून स्विस किंग रॉजर फेडररने माघार घेतली. त्याच्या या निर्णयाने लाखो चाहत्यांना जोरदार धक्का बसला. रविवारी दुसऱ्या मानांकित फेडररचा अंतिम सामना सर्बियाच्या नोवाक योकोविकशी होणार होता. मात्र, त्याने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नोवाक योकोविकला विजयी घोषित करण्यात आले. यासह सर्बियाचा टेनिसपटू योकोविक सलग तिसऱ्यांचा वर्ल्ड टूर फायनल्समध्ये एकेरीचा विजेता ठरला.

‘माझ्या पाठीला मोठी दुखापत झाली. योग्य उपचारानंतरही या दुखापतीमध्ये कोणत्याही फरक पडला नाही. त्यामुळे मला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. यासाठी मी सर्वांची माफी मागतो,’ अशी प्रतिक्रिया रॉजर फेडररने दिली. स्वीसचा रॉजर फेडरर सध्या पाठीच्या दुखापतीने त्रस्त झाला आहे. त्याचा परिणाम त्याच्या आगामी स्पर्धेतील सहभागावर पडणार आहे. यातूनच तो डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेला मुकण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

योकोविक-मरे लढत रंगली
फेडररने अंतिम सामन्यात खेळण्यास नकार दिला. या वेळी जागतिक क्रमवारीतील अव्वल दोन खेळाडूंमधील झुंज पाहण्यासाठी मोठ्या संख्येत चाहते उपस्थित होते. मात्र, फेडररच्या निर्णयाने चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. अखेर, चाहत्यांच्या खास आग्रहास्तोव नोवाक योकोविक आणि इंग्लंडचा अँडी मरे यांच्यात प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी दोन्ही खेळाडूंमधील सामना रंगतदारपणे खेळवला गेला.