आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Atul Kamble Wins 2013 Wisden MCC Cricket Photo Award

अतुल कांबळे यांच्या छायाचित्राला विस्डेन 2013 चा पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - छायाचित्रकार अतुल कांबळे यांना 2013 साठी इंग्लंडच्या विस्डेन-एमसीसीतर्फे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा छायाचित्र स्पर्धेसाठी विस्डेन हा अत्यंत मानाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.वानखेडे स्टेडियमवर शेवटचा सामना खेळून स्टेडियम सोडतानाचा सचिन तेंडुलकरचे छायाचित्र कांबळे यांनी टिपले होते. या छायाचित्रासाठी त्यांना गौरविण्यात आले आहे.

पुरस्काराचे स्वरूप 84 हजार रुपये (एक हजार युरो) असे स्वरूप असून विस्डेन क्रिकेटर्स या 2014च्या अंकात त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले जाणार आहे. कांबळे यांच्यासह दक्षिण आफ्रिकेचे शॉन रॉय व बांगलादेशचे खलीद रैहान शॅवॉन यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने गौरवण्यात आले आहे. याशिवाय अकरा निवडक छायाचित्रेदेखील विस्डेनच्या अंकात छापली जाणार आहेत.