आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Defeated Dhule In 26 Th State Kabbadi Competition

कबड्डी स्पर्धा: औरंगाबादची धुळ्यावर एका गुणाने मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - २६ व्या राज्य अजिंक्यपद किशोर कबड्डी स्पर्धेत औरंगाबादने धुळ्यावर ३४-३३ अशी एका गुणाने निसटती मात केली. क्रीडा भारती व छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा येथील ह. दे. प्रशालेच्या मैदानावर सुरू आहे. रोहित गायकवाडच्या अष्टपैलू खेळामुळे औरंगाबादला मध्यंतरास २२-१५ अशी आघाडी मिळाली होती. नंतर धुळ्याच्या खेळाडूंनी बहारदार खेळी करीत औरंगाबादची दमछाक केली. मात्र, औरंगाबादला एका गुणाने विजय मिळवता आला. दुस-या सामन्यात बीडने सिंधुदुर्गवर ५९-१३ असा विजय मिळवला. शेखर राऊळने अष्टपैलू कामगिरी केली. रवी राठोडच्या चढाया आणि संतोष राठोडच्या पकडीमुळे अहमदनगरने उस्मानाबादला २२-१९ असे हरवले. नाशिकने साता-यास २६-२३ असे नमवले. विजयाचे शिल्पकार तुषार माखुदे, सनी माने व सय्यद शकील ठरले.

सोलापूरची औरंगाबादवर मात
किशोरी गटात मात्र औरंगाबादला सोलापूरकडून २५-३४ अशी हार पत्करावी लागली. सोलापूरच्या प्रियांका केदारने अष्टपैलू खेळ करीत मैदान गाजवले. औरंगाबादकडून शीतल उकरडे हिने एकाकी लढत दिली.नाशिकने कोल्हापूरला २७-१६असे नमवले. त्यांच्या विजयाची शिल्पकार शिल्पा गुडूळकर ठरली. अन्य एका सामन्यात नांदेडने जळगवाला २३-१९ असे पराभूत केले. रोहिणी बि-हाडे व कामिनी खैरनार यांच्या चढाया प्रेक्षणीय ठरल्या. जळगावकडून दीक्षा खरतडे व शुभांगी मिळवार यांनी केलेले सामन्यातील प्रयत्न अपुरे पडले.किशोरी गटात औरंगाबादविरुद्ध सामन्यात चढाई करताना यजमान सोलापूर संघाची खेळाडू.