आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Hockey Tournament Latest News In Divya Marath

रखमाजी जाधव यांचा वॉरियर्स क्लब सेमीफायनलमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- छावणी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय सिक्स अ साइड हॉकी स्पर्धेत वॉरियर्स क्लब आणि टायगर्स क्लबने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. वॉरियर्सने इलेव्हन स्टारला 12-2 आणि टायगर्सने इंडिपेंडंटला 13-3 गोलने पराभूत केले.
पहिल्या लढतीत रखमाजी जाधव यांच्या वॉरियर्सने मध्यंतरापर्यंत 8-0 गोलने आघाडी घेत निर्विवाद वर्चस्व राखले. मध्यंतरानंतर 12-2 अशा गोल फरकाने वॉरियर्सने विजयावर शिक्कामोर्तब केले. अमान शेख आणि कलीम शेखने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजयी केले. दुसरीकडे टायगर्सने अमरावतीचे प्रतिनिधित्व करणार्‍या इंडिपेंडंटवर सुरुवातीपासून दबाव तयार केला. विशेष म्हणजे या लढतीत दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मिळून तीन हॅट्ट्रिक गोल नोंदवले. यात टायगर्सच्या शेख इम्रानची डबल हॅट्ट्रिक आणि शेख वसीमची हॅट्ट्रिकच्या बळावर टायगर्सने बाजी मारली. अमरावतीच्या प्रवीण चोरपगारचे तीन गोल व्यर्थ ठरले. या लढतीत प्रवीणने उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवला. आजच्या उपांत्य लढती : टायगर्स विरुद्ध स्टायकर्स दुपारी 3 वाजता. चॅलेंजर्स विरुद्ध वॉरियर्स सायंकाळी 4 वाजता.