आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यजमान औरंगाबाद संघाची पाचव्या स्थानावर धडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- यजमान औरंगाबाद संघाने शालेय राज्यस्तरीय फील्ड तिरंदाजी स्पर्धेत पाचव्या स्थानावर धडक मारली. पाहुण्या पुणे संघाने सर्वाधिक पदकांची कमाई करताना स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. मुंबई दुसया, तर अमरावती संघ तिसया स्थानी राहिला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विभागीय क्रीडा संकुलावर आयोजित या स्पर्धेच्या 19 वर्षांखालील मुलांच्या रिकर्व्ह गटात यजमान औरंगाबादने कांस्यपदक पटकावले. मनोज पैंगन, सचिन भुगे, सिद्धार्थ हुंबे आणि आर. शेख यांनी या गटात 1408 गुणांची कमाई करताना संघाला तिसरे स्थान मिळवून दिले. या गटात पुणे संघाने सर्वाधिक 1572 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. 1548 गुण मिळवून मुंबईने रौप्यपदकावर नाव कोरले.
19 वर्षांखालील इंडियन राउंड मुलांच्या गटात औरंगाबाद संघाने रौप्यपदक जिंकले. भगवान ढवळे, शाहरुख शेख, मयंक गोडसे, संतोष वासूने संघाचे दुसरे स्थान निश्चित केले. यजमानांनी 1697 गुण मिळवले. या गटात 2157 गुण मिळवणारा पुणे संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. मुंबईला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या टीमने 1479 गुणांची कमाई करताना तिसरे स्थान गाठले.
पुण्याला दुहेरी मुकुट
स्पर्धेच्या 19 वर्षांखालील कंपाउंड मुले आणि मुलींच्या गटात पुणे संघाने दुहेरी मुकुट पटकावला. या संघाने दोन्ही गटांत सुवर्णपदकावर नाव कोरले. मुलांच्या गटात आदित्य कुलकर्णी, मृदुल दाता, कार्तिक गवांडी, तनीष लुल्लाने पुणे संघाकडून सर्वाधिक 2527 गुणांची कमाई केली. मुलींच्या गटात वैष्णवी बोरकर, मेघा अग्रवाल, निवेदिता दातार, दिशा ओसवाल या खेळाडूंनी पुणे संघाला शानदार सुवर्णपदक मिळवून दिले. या खेळाडूंनी 2259 गुण मिळवले.