आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Zilha Cricket Team Selection News In Marathi

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघ निवड चाचणीचे आयोजन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे 19 वर्षांखालील साखळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्याचा संघ सहभागी होईल. संघ निवड चाचणीचे 15 मार्च रोजी संघटनेच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. खेळाडूंनी वयाच्या पुराव्यासह दुपारी 4 वाजता चाचणीस हजर राहावे, असे आवाहन संघटनेचे सचिव सचिन मुळे यांनी केले आहे.

सीसीएलच्या विविध समित्या जाहीर : जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे 12 एप्रिलदरम्यान होणार्‍या सेलिब्रिटी क्रिकेट लीगसाठी विविध आयोजन समित्या आयुक्त अ‍ॅड. अतुल कराड यांनी गठित केल्या. आयोजन समितीत सी.डी. दळवी, सुभाष पटेल, शिरीष बोराळकर, रमेश गुमास्ते, विष्णू लाखंडे. तांत्रिक समितीत इक्बाल सिद्दिकी, सुहास कुलकर्णी, अ‍ॅड. आलोक शर्मा, जॉन वर्गीस, सुजित करलेकर यांचा समावेश आहे.