आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोकोविच चौथ्या फेरीत ; टिप्सारेविच, मोंफिल्स, बार्तोलीला पराभवाचा धक्का

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये धक्कादायक निकालांनी गाजलेल्या शनिवारी गतचॅम्पियन नोवाक जोकोविचने शानदार कामगिरी करताना उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पेत्रा क्वितोवा, मारिया शारापोवा, सेरेना विल्यम्स यांनी तिस-या फेरीतील आपापले सामने जिंकले. मात्र, व्हेरा ज्योनारेवा, मारियन बार्तोली, जांको टिप्सारेविच, गेल मोंफिल्स यांना पराभवाचा धक्का बसला.
जागतिक क्रमवारीतील नंबर वनचा खेळाडू नोवाक जोकोविचने पुरुष एकेरीच्या तिस-या फेरीत फ्रान्सच्या निकलोस महूत याला 7-6, 6-1, 6-1 ने पराभूत केले. ही लढत जिंकण्यासाठी त्याला अवघी 74 मिनिटे लागली. चौथा मानांकित इंग्लंडच्या अ‍ॅण्डी मुरेने फ्रान्सच्या मायकेल लोड्राला 6-4, 6-2, 6-0 ने मात दिली.
महिला एकेरीत चौथी मानांकित रशियाच्या शारापोवाने जर्मनीच्या एंजेलिक कर्बरला 6-1, 6-2 ने पराभूत करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. 12 वी मानांकित अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने हंगेरीच्या गे्रटा अर्न हिला 6-1, 6-1 ने पराभूत केले. दुसरी मानांकित क्वितोवाला रशियाची मारिया किरिलेंको जखमी झाल्याचा फायदा झाला. सामना थांबला त्यावेळी चेक गणराज्यची क्वितोवा 6-0, 6-1 ने पुढे होती.
गॉस्केट, कुकुश्किन यांचे धक्कादायक विजय
17 वा मानांकित फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटने पुरुष एकेरीत धक्कादायक विजय मिळविला. त्याने नववा मानांकित सर्बियाच्या जांको टिप्सारेविचला 6-3, 6-3, 6-1 ने पराभूत केले. बिगर मानांकित कजाकिस्तानच्या मिखाईल कुकश्किनने 14 वा मानांकित फ्रान्सच्या गेल मोंफिल्सला 6-2, 7-5, 5-7, 1-6, 6-4 ने पराभूत करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत बिगरमानांकित रशियाच्या एकतेरिना माकारोवाने सातवी मानांकित आपल्याच देशाच्या व्हेरा ज्वोनारेवाला 7-6, 6-1 ने पराभूत केले. बिगर मानांकित चीनची खेळाडू जी झेंगने नववी मानांकित मरियन बार्तोलीला 6-3, 6-3 ने मात दिली.

भूपती, पेस, बोपन्ना, सानिया दुहेरीत विजय
स्पर्धेच्या सहाव्या दिवशी महेश भूपती-रोहन बोपन्ना, सानिया मिर्झा, लिएंडर पेस यांनीही दुहेरीत विजय मिळविले. भूपती-बोपन्ना यांनी ऑस्ट्रेलियाचा कर्सटन बल आणि फिलिपिन्सचा ट्रीट कॉनरॉड यांना 6-2, 6-2 ने पराभूत करून पुरुष दुहेरीच्या तिस-या फेरीत प्रवेश मिळविला. दुसरीकडे सहावी मानांकित सानिया मिर्झा-एलिना वेस्निना जोडीने बिरेन रोवा-अल्बर्टो ब्रियांती यांना 7-5, 7-5 ने पराभूत करून महिला दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत जागा मिळविली. लिएंडर पेस-एलिना वेस्निना या पाचव्या मानांकित जोडीने मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत बेलारुसचा मॅक्स मिनई आणि रशियाच्या अनास्तासिया पाव्ल्यूचेंकोवाला 6-2, 7-5 ने पराभूत केले.

शारापोवा वि.वि. एंजेलिक कर्बर
रशियाच्या चौथ्या मानांकित शारापोवाने सहज विजय मिळविला. या सामन्यात तिने 1 ऐस आणि 34 विनर मारले. कर्बरच्या तीन डबल फॉल्टचा फायदाही यावेळी तिने उचलला. यादरम्यान ताशी 174 कि.मी. वेगाने सर्व्हिसही शारापोवाने केली.

निकाल (तिसरी फेरी/पुरुष एकेरी)
विजेता विरोधी विजयाचे अंतर
लियोटन हेविट मिलोस राओनिक 4-6, 6-3, 7-6, 6-3
जो विल्फ्रेड सोंगा फ्रेडरिक गिल 6-2, 6-2, 6-2
डेव्हिड फेरर जुआन इग्नेसिया चेला 7-5, 6-2, 6-1
केई निशिकोरी जुलियन बेनेतू 4-6, 7-6, 7-6, 6-3
(तिसरी फेरी/महिला एकेरी)
अ‍ॅना इवानोविच वानिया किंग 6-3, 6-4
सारा ईराणी सोराना क्रिस्टिया 6-7, 6-0, 6-2
सेबिन लिसिकी स्वेतलाना कुज्नेत्सोवा 2-6, 6-4, 6-2