आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Austarlia Open Tennis Maria Sharapova Serena Williams

ऑस्ट्रेलियन ओपन : शारापोवा, सेरेना विजयी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - माजी रशियन चॅम्पियन मारिया शारापोवा, अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि पुरुष गटातील अव्वल मानांकित सर्बियाचा नोवाक जोकोविच यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील आपले विजयी अभियान कायम ठेवले आहे. या खेळाडूंनी विजयासह ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅमच्या तिस-या फेरीत प्रवेश मिळविला. 2009 आणि 2010 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनची विजेता असलेल्या सेरेना विल्यम्सला गुडघ्याची दुखापत झाल्यामुळे 2011 मध्ये विजेतेपद मिळविता आले नव्हते. या वेळी तिस-या फेरीतील प्रवेशासह सेरेनाने आपल्या कारकीर्दीतील 500 वा विजय साजरा केला. यासह तिने मेलबर्न पार्कवर सलग 16 वा सामना आपल्या नावे केला.
2008ची चॅम्पियन शारापोवाने 64 मिनिटे रंगलेल्या लढतीत सहजपणे आपली विरोधी खेळाडू अमेरिकेच्या जेमी हॅम्पटनला सरळ सेटमध्ये 6-0, 6-1 ने पराभूत करून तिसरी फेरी गाठली. पाच वेळेसची विजेता 12 वी मानांकित सेरेनाने 66 मिनिटे रंगलेल्या लढतीत आपली प्रतिस्पर्धी खेळाडू चेक गणराज्यच्या बारबरा जॅलावोवा स्ट्राईकोवा हिला सरळ सेटमध्ये 6-4, 6-4 ने पराभूत केले.
पुरुष गटात सर्बियाचा गत चॅम्पियन खेळाडू 24 वर्षीय जोकोविचने एक तास आणि 42 मिनिटे रंगलेल्या लढतीत कोलंबियाच्या सॅनदियागो गिराल्डो याला सरळ सेटमध्ये 6-3, 6-2, 6-1 ने पराभूत करून तिस-या फेरीत प्रवेश केला.
महिलांच्या इतर सामन्यांत रशियाच्या वेरा ज्योनारेवाने चेक गणराज्यच्या लुसी हरादेकाला सरळ सेटमध्ये 6-1, 7-6 ने पराभूत करून पुढची फेरी गाठली.
फेररचा संघर्षपूर्ण विजय
विजेतेपदाचा दावेदार असलेल्या फेररला बिगर मानांकित अमेरिकेचा खेळाडू रेयान स्विटिंगविरुद्ध विजयासाठी जोरदार संघर्ष करावा लागला. फेररने तीन तास आणि 27 मिनिटे संघर्ष केल्यानंतर 6-7, 6-2, 3-6, 6-2, 6-3 असा विजय मिळविला.
जोकोविचने 102 मिनिटांत मिळवली विजयश्री, शारापोवाचा 64 मिनिटांत विजय
गुडघे बॅले डान्सरसारखे नाहीत : सेरेना
मी आता बरी आहे. माझे गुडघे बॅले डान्सरसारखे नाहीत. सामन्यादरम्यान माझे गुडघे मोडत होते. मात्र, मला खूप जास्त त्रास झाला नाही. माझ्या गुडघ्यावर टेप लागलेला आहे आणि यामुळे मला त्रास कमी झाला, असे सामन्यानंतर सेरेना विल्यम्सने सांगितले.

अजूनही वेदना होत आहेत- शारापोवा
मारिया शारापोवाने स्पर्धेपूर्वी एकही वॉर्मअप सामना खेळला नव्हता. मात्र, स्पर्धेला सुरुवात होण्याच्या दोन आठवड्यापूर्वीच शारापोवा येथे दाखल झाली. या काळात तिने टाचेच्या दुखापतीतून सावरण्यासाठी विश्रांती घेण्यावर भर दिला. ‘माझ्या टाचेत अजूनही वेदना होत आहेत. मी सरावाला उशिरा सुरुवात केली. कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्यापेक्षा मी सरावाला अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला,’ असे शारापोवाने सांगितले. तिस-या फेरीत शारापोवाचा सामना अ‍ॅँजेलिक करबेरशी होणार आहे.

सानिया-वेस्निना दुस-या फेरीत
भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा आणि रशियाची जोडीदार एलिना वेस्निना या सहाव्या मानांकित जोडीने महिला दुहेरीच्या दुस-या फेरीत प्रवेश मिळविला आहे. सानिया-वेस्निना जोडीने 50 मिनिटे चाललेल्या लढतीत जर्मनीची अ‍ॅलेनी डॅनिलिडोऊ आणि रशियाच्या अ‍ॅलेक्झांड्रा पानोवा या जोडीला 6-0, 6-2 ने पराभूत केले. दुस-या फेरीत त्यांचा सामना चेक गणराज्यची एवा बेर्नेरोवा आणि इटलीच्या अल्बर्टो ब्रयोटी या जोडीशी होईल. बेर्नेरोवा आणि अल्बर्टो जोडीने पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या स्टेफनी बेंगसन आणि टायरा कॅँडरवूड यांना 6-4, 6-4 ने पराभूत केले.