आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविच, मुरे दुस-या फेरीत !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - गत चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीतील नंबर वनचा खेळाडू नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीच्या दुस-या फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीत दुसरी मानांकित पेत्रा क्वितोवा आणि चौथी मानांकित मारिया शारापोवा यांनीही वर्षाच्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत विजयी प्रारंभ केला. अँडी मुरेनेही शानदार कामगिरी करताना विजयश्री मिळवली.
सर्बियाच्या नोवाक जोकोविचने मंगळवारी येथे इटलीच्या पाओलो लोरेंजी याला 6-2, 6-0, 6-0 ने पराभूत केले. अव्वल मानांकित नोवाकने अवघ्या 92 मिनिटांत ही लढत जिंकली. चौथा मानांकित खेळाडू इंग्लंडच्या अ‍ॅण्डी मुरेने अमेरिकेच्या रेयॉन हॅरिसला 4-6, 6-3, 6-4, 6-2 ने पराभूत केले. पाचवा मानांकित खेळाडू स्पेनच्या डेव्हिड फेररने पोर्तुगालच्या रुई माचेडो याला 6-1, 6-4, 6-2 ने नमवले. सहावा मानांकित फ्रान्सच्या जो विल्फ्रेड सोंगाने उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिन याला 6-4, 3-6, 6-2, 7-6 ने धूळ चारली.
महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत विम्बल्डन चॅम्पियन चेक गणराज्यच्या पेत्रा क्वितोवाने रशियाच्या वेरा दुशेविना याला 6-2, 6-0 ने पराभूत केले. माजी नंबर वनची खेळाडू रशियाच्या मारिया शारापोवाने अर्जेंटिनाच्या गिसेला डुल्कोला 6-0, 6-1 ने पराभूत करून दुस-या फेरीत प्रवेश मिळवला. सातवी मानांकित रशियाच्या व्हेरा ज्वोनारेवाने रोमानियाच्या अ‍ॅलेक्झांड्रा डुलगेर याला 7-6, 6-7, 6-3 तर 14 वी मानांकित जर्मनीच्या सेबाईन लेसिकीने स्वित्झर्लंडच्या स्टेफनी वोजेल्सला 6-2, 4-7, 6-4 ने हरवले.

स्टोसूरचा पहिल्याच फेरीत पराभव
महिला एकेरीत सहावी मानांकित ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूरचा पहिल्याच फेरीत पराभव झाला. तिला बिगरमानांकित रोमानियाच्या सोराना क्रिस्टी याने 7-6, 6-3 ने स्पर्धेबाहेर केले. समंथा स्टोसूरकडून तिच्या चाहत्यांना चांगल्या कामगिरीची आशा होती. मात्र, ती आपला फॉर्म कायम ठेवू शकली नाही.
पहिल्या फेरीचे सामने (पुरुष एकेरी)
विजेता विरुद्ध गुण
गेल मोंफिल्स मारेनको मातोसेविच 7-6, 6-3, 6-3
अँडी रॉड्रिक रॉबिन हसे 6-3, 6-4, 6-1
जान्को टिप्सोरिवच दिमित्री तुर्सनोव 5-7, 7-6, 6-3, 6-4
रिचर्ड गास्केट अंद्रेस सिप्पी 6-3, 3-6, 6-3, 6-1
जाइल्स सिमोन डेनाई उदोमचोक 6-1, 3-6, 6-7, 6-3, 6-2
लियोटन हेविट केंड्रिक स्टेब 7-5, 6-4, 3-6, 7-5
महिला एकेरी
विजेता विरुद्ध गुण
स्वेतलाना कुज्नेत्सोवा शानेल शिपर्स 6-3, 3-6, 6-0
अ‍ॅना इवानोविच लाऊंड्रेंस लिनो 6-0, 6-3
मारियन बार्तोली वर्जिनी राजानो 7-5, 6-0
डॉमिनिका सिबुलकोवा मॅग्दोलेना रिबारिकोवा 6-3, 6-1
काईया केनेपी जोहन्ना लार्सन 6-2, 6-4
मारिया किरलेंको जर्मिला गजदोसोव 6-4, 6-2