आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Australia A Beat India A By 25 Runs To Enter Tri series Final

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताला नमवून ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिटोरिया - ऑस्ट्रेलिया अ संघाने रविवारी भारतीय अ संघाला पराभूत करून तिरंगी वनडे मालिकेची अंतिम फेरी गाठली. ग्लेन मॅक्सवेल (93) आणि शॉन मार्श (96) पुन्हा एकदा भारतावर वरचढ ठरले. या दोघांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिरंगी वनडे मालिकेत भारतीय अ संघाचा 25 धावांनी पराभव केला. सोमवारी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला अंतिम फेरीत स्थान निश्चित करता येईल. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने सात बाद 310 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताला 48.3 षटकांत 285 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून रोहित शर्मा (61), मुरली विजय (60) आणि चेतेश्वर पुजाराने (51) अर्धशतके ठोकली. रायडू (32) आणि रसूलनेही (नाबाद 27) चांगली कामगिरी केली. मात्र, संघाला विजयाचे लक्ष्य गाठता आले नाही.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श (34) व फिंचने (27) पहिल्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने 56 चेडूंत 12 चौकार व तीन षटकारांसह 93 धावा काढल्या.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया अ संघ : 7 बाद 310, भारत अ संघ : सर्वबाद 285 धावा.