डार्विन- रविवारी झालेल्या एकदिवसीय लढतीत ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघावर 28 धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 7 बाद 252 धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताचा डाव 46.2 षटकांत 224 धावांत आटोपला. भारताच्या संजू सॅमसनने (81) अर्धशतक ठोकले.
ऑस्ट्रेलियाच्या कॅमरून व्हॉइट 15, फिलिप्स हॉग्जने 21 धावा केल्या. अॅलेक्स डोलनने 101 चेंडूंत 96 धावा काढल्या. कॅल्युम फर्ग्युसनने 32 आणि मिशेल मार्शने 63 धावा काढल्या. भारताच्या मोहित शर्मा आणि धवल कुलकर्णीने प्रत्येकी 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरात भारताकडून रॉबिन उथप्पा (25), उन्मुक्त चंद (23), मनीष पांडे (7), मनोज तिवारी (2) व अंबाती रायडू (6) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. संजू सॅमसनने 98 चेंडूत 81 धावा केल्या. उभारल्या. परवेज रसूल (25), धवन कुलकर्णी (20), मोहित शर्मा (19) यांनी थोडाफार संघर्ष केला. केन रिचर्डसनने 5 बळी घेतले.