आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलिया व भारत अ संघ यांच्यात तीनदिवसीय क्रिकेट सामन्याला आजपासून प्रारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- ऑस्ट्रेलिया व भारत अ संघ यांच्यात तीनदिवसीय क्रिकेट सामन्याला शनिवारपासून गुरुनानक कॉलेज मैदानावर प्रारंभ होणार आहे. ऑस्ट्रेलिया टीम या सामन्यात पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. दुसरीकडे टीममधून बाहेर झालेला गौतम गंभीर या लढतीच्या माध्यमातून आपल्या गमावलेला फॉर्म परत आणण्याचा प्रयत्न करील. गंभीरच्या नेतृत्वाखाली भारत अ संघ खेळणार आहे. सलग सुमार कामगिरी करणा-या गंभीरवर निवड समितीने विश्वास ठेवला नाही. यामुळे त्याला कसोटी टीममधून बाहेर करण्यात आले.

ऑस्ट्रेलिया सामन्यात आपल्या फलंदाजी व गोलंदाजीला संतुलित करण्याचा प्रयत्न करणार आहे. ऑस्ट्रेलियाकडे सलामीवीराच्या रूपात डेव्हिड वॉर्नर, एड कोवान आहे. कर्णधार मायकल क्लार्क, फिलीप ह्युज, शेन वॉटसन, स्टीव स्मिथ व उस्मान ख्वाजा यांच्यामुळे कांगारूंची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. याशिवाय नवोदित ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलवरदेखील अष्टपैलू कामगिरी करण्याची जबाबदारी असेल.

भारताकडून गौतम गंभीर, मधल्या फळीतला फलंदाज रोहित शर्मा, मनोज तिवारी, अभिषेक नायर आणि वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी, मनप्रीत गोनीचा निवड समितीचे लक्ष वेधण्यासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल.
चेन्नई येथील मैदानावर सराव करताना मायकल क्लार्क व भारताचा जीवनज्योत सिंग.

या खेळाडूंमधून संघाची निवड
गौतम गंभीर (कर्णधार), जीवनज्योत सिंग, रोहित शर्मा, मनोज तिवारी, सी. गौतम, राकेश धुव्र, जलज सक्सेना, मनप्रीत गोनी, विनय कुमार, धवल कुलकर्णी, अशोक मनोरिया, अभिषेक नायर.