Home »Sports »Latest News» Australia And The West Indies Prepare For World Cup Final

महिला वर्ल्डकप: ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडीज आज फायनल

वृत्तसंस्था | Feb 16, 2013, 23:54 PM IST

  • महिला वर्ल्डकप:  ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडीज आज फायनल

मुंबई- वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी वर्ल्डकप महिला क्रिकेट स्पर्धेतील फायनल सामना रविवारी खेळवला जाईल. ही लढत मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होईल. विंडीजची टीम पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचली आहे, तर ऑस्ट्रेलियन टीम पाच वेळेसची विजेती आहे.

वेस्ट इंडीज महिला संघाने आपल्या अखेरच्या ‘सुपरसिक्स’ लढतीत ऑस्ट्रेलिया 8 धावांनी हरवले होते. ही कामगिरी पुन्हा करण्यास कॅरेबियन टीम सज्ज झाली आहे. या विजयाने विंडीजच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे. वेस्ट इंडीज संघाने यजमान भारताकडून 105 धावांनी पराभूत झाल्यानंतर स्पर्धेत धक्कादायक कामगिरी करून पुनरागमन केले आणि फायनलमध्ये स्थान मिळवले.

हे आहेत खास खेळाडू
ऑस्ट्रेलियाला वेस्ट इंडीजच्या स्टेफनी टेलरकडून सावध राहावे लागेल. तिने मागच्या सहा सामन्यांत एका शतकासह 309 धावा ठोकल्या आहेत. स्पर्धेत सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत ती दुस-या स्थानी आहे. टेलरशिवाय दिंयाद्रा डॉटिनने 204 धावा काढल्या.

ऑस्ट्रेलियाकडून रॅचेल हेन्सने 221 धावा, मॅग लेनिंगने 195 धावा तर जेस कॅमरूनने 150 धावा काढल्या आहेत. गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या मेगन शटने 13 विकेट घेऊन आघाडी ठेवली आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या होली फर्लिंगने चार सामन्यांत 9 विकेट घेतल्या आहेत. वेस्ट इंडीजकडून डॉटिनने 9 विकेट आणि शॅनेल डेलीने सात गडी बाद केले आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ असून, फायनल रंगतदार होईल.

Next Article

Recommended