Home »Sports »From The Field» Australia Beat Holders England In Women's World Cup

महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवर मात

वृत्तसंस्था | Feb 09, 2013, 04:55 AM IST

  • महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवर मात

मुंबई - विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी गतविजेत्या इंग्लंडला सुपरसिक्समध्ये दोन धावांनी पराभूत केले. ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. दुसर्‍या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेला आणि कटक येथे वेस्ट इंडीजने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले.

ऑस्ट्रेलियाचा शानदार विजय- ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 44.4 षटकांत 147 धावा काढल्या होत्या. मात्र, कांगारूंच्या धारदार गोलंदाजीपुढे धावांचा पाठलाग करणार्‍या इंग्लंडच्या महिला टीमला 47.3 षटकांत 145 धावा काढता आल्या. इंग्लंडचे सहा गडी 39 धावसंख्या असताना बाद झाले. लिडीया ग्रीनने 49 धावा काढून इंग्लंडची बाजू सावरली.

हौली कोल्विन (16), अन्या र्शबसोल (13) यांनी विजयासाठी प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाकडून साराने 44 व लिसा स्थळेकरने 41 धावा काढल्या. गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या फर्लिंगने तीन व हंटर व सुटने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.


न्यूझीलंडची लंकेवर मात - ली ताहुहुने (27 धावांवर चार विकेट) केलेल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने लंकेला आठ विकेटने धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना र्शीलंका टीमने 42 षटकांत 103 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 23 षटकांत लक्ष्य गाठले. न्यूझीलंडकडून से फ्रान्सेसने नाबाद 39, सुजी बेटसने 37 धावा काढल्या.

दक्षिण आफ्रिकेचा पराभव - स्टेफनी टेलरने 75 धावांची शानदार खेळी करून वेस्ट इंडीजला सुपरसिक्स सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दोन गडी राखून विजय मिळवून दिला. नाणेफेक जिंकून आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना सात गडी गमावून 230 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात विंडीजने 45.3 षटकांत 234 धावा काढून विजय मिळवला.

Next Article

Recommended