आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-२० : ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानचा धुव्वा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : डेव्हिड वॉर्नर
दुबई - डेव्हिड वॉर्नरच्या (५३) नाबाद झंझावाती फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघाने टी-२० सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलिया संघाने १४ षटकांत सहा गड्यांनी सामना जिंकला. धारदार गोलंदाजी करून तीन बळी घेणारा ग्लेन मॅक्सवेल सामनावीरचा मानकरी ठरला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत नऊ गडी गमावून ९६ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने चार गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. डेव्हिड वॉर्नर व फ्युकनर यांनी अभेद्य ४१ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला शानदार विजय मिळवून दिला.

धावांचा पाठलाग करणा-या ऑस्ट्रेलिया संघाची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर अ‍ॅरोन फिंच अवघ्या पाच धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने १० चेंडूंचा सामना करताना तीन चाैकारांच्या आधारे १७ धावा काढल्या.

ग्लेन मॅक्सवेलची धारदार गोलंदाजी
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत ग्लेन मॅक्सवेलने धारदार गोलंदाजी केली. त्याने तीन षटकांत १३ धावा देत तीन गडी बाद केले. त्याने सलामीवीर ए. झिया( ३), उमर आमीन (०) व शोहेब मकसूदला (०) तंबूत पाठवले. त्यापाठोपाठ कॅमरून बायसीने दोन विकेट घेतल्या. त्यामुळे पाककडून नासीमने २५ धावांची खेळी केली.