आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेलबोर्न- ऍशेस मालिकेच्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 8 विकेट्स राखून धुव्वा उडवला. विजयासाठी 231 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सच्या मोबदल्यात गाठले. सलामीवीर ख्रिस रॉजर्सने दमदार शतक ठोकले. अष्टपैलू शेन वॉटसनने आक्रमक नाबाद 83 धावांची खेळी करुन इंग्लंडच्या आव्हानाची हवाच काढून घेतली.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी शनिवारी सामन्याच्या तिस-या दिवशी इंग्लंडला अवघ्या 179 धावांमध्येच गुंडाळले होते. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी कांगारुंनी बिनबाद 30 धावांपर्यंत मजल मारली होती. आज खेळ सुरु झाल्यानंतर डेव्हीड वॉर्नर आणि ख्रिस रॉजर्स या जोडीने आणखी 34 धावा जोडून 64 धावांची सलामी दिली. वॉर्नर 25 धावा काढून परतला. तो बाद झाल्यानंतर रॉजर्स आणि वॉटसन या जोडीने 136 धावा जोडल्या. सुरुवातीला रॉजर्सने आक्रमक पावित्रा घेतला हळूहळू वॉटसननेही फटकेबाजी सुरु केली. रॉजर्सने 11 चौकारांसह शतक पूर्ण केले. तो 116 धावा काढून परतला. तोपर्यंत ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित झाला होता. रॉजर्स परतल्यानंतर वॉटसनने फटकेबाजी करुन उर्वरित 31 धावा झटपट काढल्या. मायकल क्लार्क 6 धावांवर नाबाद राहीला.
या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली असून इंग्लंडपुढे आता व्हाईटवॉश टाळण्याचे आव्हान आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.