आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Australia Beats England To Win Tri series Final In 112 run Victory In Perth

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलियाने जिंकली तिरंगी मालिका, इंग्लंडचा ११२ धावांनी पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्थ - आगामी विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज असलेल्या यजमान ऑस्ट्रेलिया संघाने तिरंगी मालिका आपल्या नावे केली. यजमान संघाने रविवारी अंतिम सामन्यात इंग्लंडचा ११२ धावांनी पराभव केला. यासह यजमानांनी मालिकेवर नाव कोरले. ग्लेन मॅक्सवेल (९५ धावा, बळी) हा ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या वेळी मॅक्सवेलला सामनावीर आणि स्टार्कला मालिकावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

मॅक्सवेलच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ३९.१ षटकांत सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने आठ गड्यांच्या मोबदल्यात इंग्लंडसमोर २७९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मॅक्सवेल (४/४६), मिचेल जॉन्सन (३/२७) आणि हॅझलवुड (२/१३) यांच्या धारदार गोलंदाजीमुळे इंग्लंडने १६६ धावांत गाशा गुंडाळला.

खडतर आव्हानाला सामोरे जात असलेल्या इंग्लंडची निराशाजनक सुरुवात झाली. इयान बेल (८) टेलर (४) स्वस्तात बाद झाले. मोईन अलीने २६ आणि ज्यो रुटने २६ धावांची खेळी केली. मोर्गनला भोपळा ही फोडता आला नाही.
मॅक्स‘वेल’
यजमान ऑस्ट्रेलिया संघाकडून ग्लेन मॅक्सवेल चमकला. त्याने करिअरमधील सर्वाेत्कृष्ट कामगिरी केली. त्याने फलंदाजी करताना संघाकडून सर्वाधिक ९५ धावा काढल्या. त्याने ९८ चेंडूंचा सामना करताना १५ चाैकाराच्या आधारे ९५ धावा काढल्या. तसेच गोलंदाजीत त्याने चार बळी घेतले.

(फोटो : तिरंगी मालिका जिंकल्यानंतर चषकासह ऑस्ट्रेलियाचा संघ.)