आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेस्‍ट इंडिजचा 70 धावांमध्‍येच खुर्दा, ऑस्‍ट्रेलियाचा विक्रमी विजय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ- पर्थच्‍या वेगवान खेळपट्टीवर ऑस्‍ट्रेलियाने वेस्‍ट इंडिजचा धुव्‍वा उडवून विक्रमी विजय मिळविला. वेस्‍ट कांगारुंनी इंडिजचा अवघ्‍या 70 धावांमध्‍ये खुर्दा केला. ही वेस्‍ट इंडिजची वन डे क्रिकेटमधील नीचांकी धावसंख्‍या आहे. विजयासाठी 71 धावांचे लक्ष ऑस्‍ट्रेलियाने केवळ 9.2 षटकांमध्‍ये 1 विकेट गमावून पूर्ण केले.

वेस्‍ट इंडिजचा डाव केवळ 23.5 षटकांमध्‍ये संपुष्‍टात आला. मिशेल स्‍टार्क वेस्‍ट इंडिजच्‍या फलंदाजांचा कर्दनकाळ ठरला. त्‍याने केवळ 20 धावा देऊन 5 विकेट घेतल्‍या. तर क्लिंट मकायने 10 धावा देऊन 3 फलंदाज बाद केले. फॉकनरने 14 धावांमध्‍ये 2 बळी घेऊन उत्तम साथ दिली. वेस्‍ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमीने सर्वाधिक 16 धावा काढल्‍या. तर डॅरेन ब्राव्‍हो आणि केरोन पॉवेलने प्रत्‍येकी 11 धावा काढल्‍या. या दोघांच्‍या व्‍यतिरिक्त एकही फलंदाज दुहेरी धावसंख्‍या गाठू शकला नाही.