मेलबर्न – ‘चार वेळा विश्वविजेता असलेला ऑस्ट्रेलियन संघ मायकल क्लार्क शिवाय विश्वचषक जिंकूच शकत नाही’, असे मत ऑस्ट्रेलया महान स्पिनर शेन वॉर्नने म्हटले आहे.
क्लार्क दुखापतीमुळे सध्या मैदाना बाहेर आहे. भारताविरुद्धच्या कसोटीत पायाला झालेल्या दुखापतीनंतर तो मैदानावर होता. पण, शनिवारी एका स्थानिक सामन्यात त्याने मैदानात उतरत अर्धशतक झळकाविले होते. त्यांच्या दुखापतीमुळे कर्णधारपदाची धुरा स्टीवन स्मिथकडे होती.
‘वर्षभरापूर्वी ऑस्ट्रेलिया संघ विस्कळीत होता. त्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिका 5-0 अशी जिंकली आणि दक्षिण आफ्रिकेचा त्यांच्या देशात पराभव केला.’ असे वॉर्नने म्हटले.
पुढील स्लाइडवर वाचा, जॉर्ज बेली विषयी काय म्हणाला वॉर्न ..