आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अव्वल ऑस्ट्रेलियाचे विजेतेपदावर लक्ष्य, गतविजेत्या भारतीय संघाचा स्पर्धेतील मार्ग कठीण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मर्यादित ५० षटकांच्या क्रिकेट क्रमवारीतील आपले अव्वल स्थान अबाधित राखण्याच्या दृष्टीने यंदाच्या विश्वचषकाच्या निमित्ताने यजमान ऑस्ट्रेलिया प्रयत्न करत आहे. गतविजेता भारतीय संघ यजमानांपाठोपाठ असला तरीही यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौ-यातील कामगिरी पाहता या भारतावर विश्वास टाकायला कुणीही तयार नाही.

सध्याच्या क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेले विश्वचषकाचे दुसरे यजमान न्यूझीलंड हेदेखील संभाव्य विजेतेपदासाठी 'डार्क हॉर्स' म्हणून ओळखले जात आहेत. न्यूझीलंडचे सर्व साखळी सामने व बाद फेरीचे सामने न्यूझीलंडमध्ये होणार आहेत. क्रमवारीत तिस-या क्रमांकावर आफ्रिका आहे.

विराट कोहली तिस-या क्रमांकावर, शिखर धवन सातव्या क्रमांकावर, कप्तान महेंद्रसिंग धोनी नवव्या रोहित शर्मा १३व्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर हा भारतीयांतर्फे सर्वोत्तम रँकिंग (१३) असणारा गोलंदाजही पूर्णपणे फिट नाही.

एकदिवसीय क्रमवारी
क्रम संघ गुण
१ ऑस्ट्रेलिया १२०
२ भारत ११४
३ दक्षिण आफ्रिका ११३
४ श्रीलंका १०८
५ इंग्लंड १०४
६ न्यूझीलंड १०३
७ पाकिस्तान ९५
८ वेस्ट इंडीज ९४
९ बांगलादेश ७५
१० झिम्बाब्वे ५३