आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia, David Warner, Cricket, Australia, Maharashtra

वॉर्नरचा शतकी दणका!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- सलगच्या विजयाने आत्मविश्वास बुलंदीवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने मंगळवारी भारतविरुद्ध चौथ्या कसोटीत पहिल्या दिवशी दमदार सुरुवात केली. यजमानांनी पहिल्या दिवसअखेर दोन गड्यांच्या मोबदल्यात ३४८ धावा काढल्या. डेव्हिड वॉर्नर (१०१) आणि रॉजर्स (९५) यांच्या द्विशतकी भागीदारीच्या बळावर कांगारूंनी धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर शेन वॉटसन आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथने अभेद्य १४४ धावांची भागीदारी करून संघाच्या धावसंख्येला गती दिली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा वॉटसन (६१) आणि स्मिथ (८२) मैदानावर खेळत आहेत. भारताच्या शमी आणि आर. अश्विनने प्रत्येकी एक गडी बाद केला.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रॉजर्स आणि वॉर्नर यांनी संघाला २०० धावांच्या भागीदारीची सलामी दिली. यासह या जोडीने संघाला दमदार सुरुवात करून दिली.दरम्यान, भारताच्या गोलंदाजांनी ही जोडी फोडण्यासाठी झुंज दिली. अखेर ४४.५ षटकांत आर. अश्विनने संघाला वॉर्नरच्या रूपाने पहिला बळी मिळवून दिला. त्यापाठोपाठ मोहंमद शमीने ४५.५ षटकांत संघाला दुसरा महत्त्वाचा बळी मिळवून दिला.

धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव धावा चेंडू ४ ६
रोजर्स पायचित गो. मो. शमी ९५ १६० १३ ०
वॉर्नर झे. विजय गो. अश्विन १०१ ११४ १६ ०
शेन वॉटसन नाबाद ६१ १३२ ०६ ०

स्टिवन स्मिथ नाबाद ८२ १३४ १० ०
अवांतर : ९. एकूण : ९० षटकांत २ बाद ३४८ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-२००, २-२०४. गोलंदाजी : भुवनेश्वर २०-२-६७-०, उमेश यादव १६-१-९७-०, मो. शमी १६-२-५८-१, आर. अश्विन २८-५-८८-१, रैना १०-२-३५-०.
शिखर धवन (२९)
वेगाने धावा काढतो. रोहितसोबत सलामीची जोडी. मोठे फटके खेळण्यात तरबेज. गोलंदाजांवर दबाव आणतो.