आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाचा विजयी चौकार; इंग्लंडने घातले पुन्हा लोटांगण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - कर्णधार मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया टीमने रविवारी इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस कसोटी मालिकेत विजयी चौकार ठोकला. या टीमने मालिकेतील चौथ्या कसोटीत इंग्लंडचा 8 गड्यांनी पराभव केला. यासह यजमान टीमने मालिकेत 4-0 ने विजयी आघाडी घेतली. सुमार कामगिरी करणार्‍या इंग्लंड टीमवर आता व्हाइटवॉशचे सावट निर्माण झाले आहे. पाचवी कसोटी 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे.


मिशेल जॉन्सन व क्रिस रॉजर्स चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. जॉन्सनने (5/63, 3/25) गोलंदाजी करताना आठ विकेट घेतल्या. रॉजर्सने 116 धावा काढल्या. जॉन्सन तिसर्‍यांदा सामनावीराचा मानकरी ठरला.

इंग्लंडने विजयासाठी ऑस्ट्रेलियासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात कांगारूंनी रविवारी बिनबाद 30 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. रॉजर्स आणि डेव्हिड वॉर्नरने (25) टीमची विजयी पताका फडकवली. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार कुकने दोन वेळा झेल सोडून रॉजर्स आणि वॉर्नरला जीवदान मिळवून दिले.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : पहिला डाव -255, दुसरा डाव-179, ऑस्ट्रेलिया : पहिला डाव-204, दुसरा डाव : 2 बाद 231.