आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवर 88 धावांनी मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मँचेस्टर - ऑस्ट्रेलियाने मालिकेतील दुस-या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 88 धावांनी पराभव केला. या विजयासह कांगारूंनी पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. पावसाच्या व्यत्ययामुळे यापूर्वी सलामीचा सामना होऊ शकला नाही. कर्णधार मायकेल क्लार्कच्या (105) शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 7 बाद 315 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 44.2 षटकात अवघ्या 227 धावांत गुंडाळला गेला. मालिकेतील ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यातील तिसरा वन डे बुधवारी बर्मिगहॅम येथे होणार आहे.


धावांचा पाठलाग करणा-या इंग्लंडची निराशाजनक सुरुवात झाली. मात्र, सलामीवीर केविन पीटरसन (60) व कर्णधार इयान मोर्गनने (54) संघाला सावरले. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 59 धावांची भागीदारी केली. यामध्ये पीटरसनने 66 चेंडूंत सहा चौकार व दोन षटकारांसह 60 धावा काढल्या. दरम्यान, वॉटसनने पीटरसनला झेलबाद केले. मोर्गनला सातव्या क्रमांकावर आलेल्या बटलरने (75) साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. मात्र, त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही.


क्लार्क-बेलीची दीडशतकी भागीदारी
प्रथम फलंदाजी करणा-या ऑस्ट्रेलियाला फिंच (45) व वॉटसनने (38) चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी दुस-या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. क्लार्क आणि जॉर्ज बेलीने (82) चौथ्या गड्यासाठी 155 धावांची भागीदारी करताना संघाला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली.


संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : 7 बाद 315 वि.वि. इंग्लंड : सर्वबाद 227