आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिरंगी वन डे मालिकl - ऑस्ट्रेलियाचा भारतावर 7 गडी राखून विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिटोरिया - ऑस्ट्रेलिया अ संघाने तिरंगी वन डे मालिकेत गुरुवारी भारतीय अ संघाचा 7 गड्यांनी पराभव केला. आयपीएल-6 मधील मिलियन डॉलर बेबी ग्लेन मॅक्सवेलच्या (145) नाबाद शतकाच्या बळावर कांगारूंनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 8 बाद 298 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात भारत अ संघाला 8 गड्यांच्या मोबदल्यात 291 धावांपर्यंत मजल मारता आली. चेतेश्वर पुजाराच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मालिकेत खेळत आहे.
धावांचा पाठलाग करणा-या भारताकडून सुरेश रैना (83), सलामीवीर रोहित शर्मा (66) आणि अंबाती रायडू (70) या तिन्ही खेळाडूंनी झळकावलेली अर्धशतके व्यर्थ ठरली. कर्णधार चेतेश्वर पुजारा (29), कार्तिक (10) आणि सलामीवीर शिखर धवन (15) झटपट बाद झाले. गोलंदाजीत कोऊल्टेर-निलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. हेझलवूडने 9 षटकांत 60 धावा देऊन दोन गडी बाद केले.


तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाची निराशाजनक सुरुवात झाली. कांगारूंनी 37 षटकांपर्यंत 8 बाद 152 धावा काढल्या होत्या. त्यानंतर मॅक्सवेलने हेझलवूडसोबत अभेद्य 146 धावांची भागीदारी करून संघाला मोठा स्कोर उभा करून दिला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया अ संघ : 8 बाद 298 धावा वि.वि. भारत अ संघ : 8 बाद 291 धावा.