आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सराव सामनाः ऑस्‍ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्‍की, राकेश ध्रुवचे 5 बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्‍नई- भारत दौ-यावर आलेल्‍या ऑस्‍ट्रेलियन क्रिकेट संघावर आज सराव सामन्‍यात फॉलोऑनची नामुष्‍की ओढावली. चेन्‍नईत भारत 'अ' संघाविरुद्ध सुरु असलेल्‍या सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाचा संघ 235 धावांमध्‍ये गारद झाला. त्‍यानंतर 'अ' संघाचा कर्णधार गंभीरने फॉलोऑन देण्‍याचा निर्णय घेतला.

भारत 'अ' संघाने पहिल्‍या डावात 451 धावा केल्‍या होत्‍या. त्‍यानंतर ऑस्‍ट्रेलियाने शतकी सलामी देऊन दमदार प्रत्‍युत्तर दिले होते. परंतु, सलामीवीर बाद होताच डाव कोसळला. तरीही यष्‍टीरक्षक मॅथ्‍यू वेडने 44 धावांची खेळी करुन डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न केला. वॉटसनने 84, एड कोवानने 40 तर मोझेस हेन्‍ड्रीक्‍सने 33 धावांचे योगदान दिले.

डावखुरा फिरकीपटू राकेश ध्रुवने 5 बळी घेत ऑस्‍ट्रेलियाच्‍या डावाला खिंडार पाडले. तर जलज सक्‍सेनाने 4 बळी घेत त्‍याला दमदार साथ दिली. दुस-या डावात ऑस्‍ट्रेलियाने उपहारापर्यंत बिनबाद 38 धावांपर्यंत मजल मारली होती.