आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाकडून भारतीय टीमला दिवाळीचे गिफ्ट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयर्लंड- ऑस्ट्रेलिया टीमने भारतीय पुरुष हॉकी संघाला दिवाळीचे एक गिफ्ट दिले आहे. ऑस्ट्रेलियामुळे भारतीय संघाचा आगामी विश्वचषक हॉकी स्पर्धेतील प्रवेश निश्चित झाला आहे. मागील दोन स्पर्धांत भारताला अपयशाला सामोरे जावे लागले होते.

येत्या 31 मे 2014 रोजी हॉलंडच्या हेग येथे विश्वचषक हॉकी स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) भारतीय संघाने विश्वचषकाचे तिकीट मिळवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. भारतीय संघाला स्पर्धेतील प्रवेश निश्चित करण्यासाठी अप्रत्यक्षपणे ऑस्ट्रेलिया टीमचे मोलाचे सहकार्य मिळाले.

ऑस्ट्रेलियाने रविवारी ओशियाना चषक चॅम्पियनशिप जिंकली. यातील विजेत्याला वर्ल्डकपचे तिकीट मिळणार होते. यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील प्रवेश निश्चित झालेला होता. त्यामुळे हे स्थान रिझर्व्ह होते. गत स्पर्धेत भारताने उपांत्य फेरी गाठून सहावे स्थान पटकावले होते. भारताला विश्वचषक हॉकी स्पर्धेतील तिकीट मिळाले.

22 संघ ठरले पात्र
हेग येथे होत असलेल्या आगामी विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी महिला व पुरुषांच्या एकूण 22 टीम पात्र ठरल्या आहेत. दोन्ही गटांत प्रत्येकी 11 संघांचा समावेश आहे. या दोन्ही गटांत प्रत्येकी एक स्थान रिकामे आहे. यामध्ये आफ्रिकी चषक स्पर्धेतील विजेत्या महिला व पुरुष संघाला स्थान मिळणार आहे. ही स्पर्धा 18 ते 24 नोव्हेंबरदरम्यान आयोजित केली जाईल.