आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia Have Won The Toss And They Will Bat First

पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर 72 धावांनी मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - गोलंदाजांच्या सुमार कामगिरीनंतर फलंदाजांनीही गुडघे टेकवल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडेत भारताचा 72 धावांनी पराभव झाला. पुण्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाकडून एकटा विराट कोहली (61) झुंजला. इतरांनी सपशेल हाराकिरी केली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 304 धावा काढल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला 232 धावाच काढता आल्या. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना 16 ऑक्टोबर रोजी जयपूर येथे होईल.

धावांचा पाठलाग करताना भारताकडून कोहलीशिवाय सलामीवीर रोहित शर्मा (42) आणि सुरेश रैना (39) यांनी थोडा संघर्ष केला. इतरांनी तर खेळपट्टीवर फक्त हजेरी लावण्याचे काम केले. शिखर धवन (07), युवराजसिंग (07), कर्णधार धोनी (19), रवींद्र जडेजा (11), आर. आश्विन (5) या फलंदाजांच्या अपयशामुळे भारताचा पराभव झाला. गोलंदाजीत ईशांत शर्मा (7 षटके, 56 धावा, 1 विकेट) प्रचंड महागडा ठरला.

बेली, फिंचचे तुफानी अर्धशतक
तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाहुण्या संघाकडून अँरोन फिंच (72) आणि कर्णधार जॉर्ज बेली (85) यांनी अर्धशतके ठोकली. सलामीवीर फिलिप ह्युजेस (47) आणि अँरोन फिंच यांनी 110 धावांची शतकी सलामी देऊन कर्णधार जॉर्ज बेलीचा निर्णय योग्य ठरवला. ह्युजेसला 47 धावांवर जडेजाने रैनाकरवी झेलबाद करून ही भागीदारी मोडली. तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या शेन वॉटसनला (2) मोठी खेळी करता आली नाही. फिंच 72 धावा काढून युवराजचाच बळी ठरला. फिंचने 79 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार आणि 3 षटकार ठोकले. फिंचनंतर कर्णधार बेलीने (85) अर्धशतक ठोकून संघाला तिनशेपेक्षा अधिक धावांचा स्कोअर उभा करून दिला. बेलीने 82 चेंडूंत 10 चौकारांसह 85 धावा काढल्या.

आश्विन, युवराज चमकले
मधल्या फळीत अँडम वोग्स 7 धावांवर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने अवघ्या 23 चेंडूंत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 31 धावा ठोकून धावगती वाढवली. हॅडिन (10) बाद झाल्यानंतर जेम्स फ्युकनरनेही 22 चेंडूंत 2 षटकारांसह 27 धावा ठोकल्या. बेली बाद झाल्यानंतर तळाचा फलंदाज क्लायंट मॅकेने 4 चेंडूंत 1 षटकार, 1 चौकार ठोकून ऑस्ट्रेलियाला तिनशेचा टप्पा ओलांडून दिला. भारताकडून युवराजने 34 धावांत 2 तर आश्विनने 55 धावांत 2 गडी बाद केले. विनयकुमार, ईशांत आणि जडेजा यांनी प्रत्येकी एकाला टिपले.


कोहलीचे झुंजार अर्धशतक
टीम इंडियाकडून मधल्या फळीचा फलंदाज विराट कोहलीने फॉर्म कायम ठेवताना अर्धशतक ठोकले. कोहलीने भारताकडून सर्वाधिक 61 धावा काढल्या. त्याने तिसर्‍या विकेटसाठी सुरेश रैनासोबत 71 धावांची भागीदारी करून आशा जागवल्या होत्या. मात्र, इतर फलंदाजांच्या अपयशामुळे भारताचा पराभव झाला. कोहलीने 85 चेंडूंचा सामना करताना 6 चौकारांसह ही खेळी साकारली. मैदानावर स्थिरावलेल्या कोहलीला शेन वॉटसनने पायचीत केले. कोहली पाचव्या फलंदाजाच्या रूपाने बाद झाला त्या वेळी भारताच्या 34.4 षटकांत 166 धावा झाल्या होत्या. तो बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या विजयाची आशा धूसर झाली. तो पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर धोनी आणि जडेजा विशेष कामगिरी करू शकले नाहीत.


गोलंदाजांमुळे कांगारूंचा विजय
सामन्यात दोन्ही संघांतील महत्त्वाचा फरक म्हणजे गोलंदाजी. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय गोलंदाजांच्या तुलनेत चांगली गोलंदाजी केली. त्यांनी अचूक टप्प्यावर मारा करताना भारतीय फलंदाजांना कोंडीत पकडले. याउलट भारतीय गोलंदाजांनी शॉर्टपिच, ओव्हरपिच चेंडू देऊन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धावा बहाल केल्या.


धावफलक
ऑस्ट्रेलिया धावा चेंडू 4 6
ह्युजेस झे. रैना गो. जडेजा 47 53 05 00
फिंच झे. कोहली गो. युवराज 72 79 08 03 वॉटसन झे. जडेजा गो. युवराज 02 04 00 00
बेली झे. रैना गो. आश्विन 85 82 10 00
वोग्स धावबाद 07 13 00 00
मॅक्सवेल झे. रोहित गो. विनय 31 23 01 03
हॅडिन पायचीत गो. आश्विन 10 14 00 02
फ्युकनर झे. विनय गो. ईशांत 27 22 00 02
जॉन्सन नाबाद 09 06 02 00
क्लायंट मॅके नाबाद 11 04 01 01

अवांतर : 03. एकूण : 50 षटकांत 7 बाद 304. गडी बाद होण्याचा क्रम : 1-110, 2-113, 3-146, 4-172, 5-214, 6-231, 7-264, 8-293. गोलंदाजी : भुवनेश्वरकुमार 7-2-41-0, विनयकुमार 9-1-68-1, ईशांत शर्मा 7-0-56-1, रविचंद्रन आश्विन 10-0-55-2, रवींद्र जडेजा 10-0-35-1, विराट कोहली 1-0-12-0, युवराजसिंग 6-0-34-2.

भारत धावा चेंडू 4 6
धवन झे. हॅडिन गो. फ्युकनर 07 15 01 00

रोहित झे. ह्युजेस गो. वॉटसन 42 47 06 00

कोहली पायचीत गो. वॉटसल 61 85 06 00

रैना झे. डोहर्ती गो. फ्युकनर 39 45 02 01

युवराज झे. ह्युजेस गो.जॉन्सन 07 07 00 01

धोनी त्रि. गो. क्लायंट मॅके 19 22 02 00

जडेजा झे. बेली गो. फ्युकनर 11 18 01 00

आश्विन झे. वॉटसन गो. मॅके 05 10 00 00

भुवनेश्वर झे. वोग्स गो. फिंच 18 27 01 00

विनयकुमार त्रि. गो. वोग्स 11 19 01 00

ईशांत शर्मा नाबाद 01 03 00 00

अवांतर : 11. एकूण : 49.4 षटकांत सर्वबाद 232 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-26, 2-66, 3-137, 4-147, 5-166, 6-192, 7-196, 8-200, 9-230, 10-232. गोलंदाजी : मिशेल जॉन्सन 10-0-38-1, क्लायंट मॅके 10-0-36-2, जेम्स फ्युकनर 8-0-47-3, झेव्हियर डोहर्ती 10-1-54-0, शेन वॉटसन 8-0-31-2, अँडम वोग्स 3-0-18-1, अँड्रय़ू फिंच 0.4-0-2-1.

चालू सामन्याचे फोटो बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...