आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia In Strong Position After Mitchel Johnson Takes 7 Wickets

ऍशेसचे द्वंद्वः मिशल जॉन्‍सनसमोर इंग्‍लंडची शरणागती; कांगारुंची पकड मजबूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऍडीलेड- ऑस्‍ट्रेलिया आणि इंग्‍लंड यांच्‍यात सुरु असलेल्‍या ऍशेस मालिकेतील दुस-या कसोटी सामन्‍यावर ऑस्‍ट्रेलियाने पकड घट्ट केली आहे. वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्‍सनच्‍या भन्‍नाट गोलंदाजीपुढे इंग्‍लंडच्‍या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्‍कारली. हा सामना ऍडीलेड ओव्‍हलवर सुरु आहे. मिशेल जॉन्‍सनने 7 बळी घेत इंग्‍लंडची आघाडीची फळी कापून काढली.

ऑस्‍ट्रेलियाने दुस-या दिवशी पहिला डाव 570 धावांवर घोषित केल्‍यानंतर इंग्‍लंडचे 3 फलंदाज बाद झाले होते. त्‍यात कर्णधार ऍलिस्‍टर कुकची विकेट जॉन्‍सनेच घेतली होती. आज (शनिवारी) जॉन्‍सनने जबरदस्‍त गोलंदाजी करत इंग्‍लंडचे अखेरचे 6 फलंदाज बाद केले. इंग्‍लंचा पहिला डाव 172 धावांवरच आटोपला. इयन बेल 72 धावांवर नाबाद होता.

दुस-या डावात वॉर्नरची बॅट तळपली... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...