आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँशेस: पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाची 303 धावांची मजबूत खेळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर) - कर्णधार मायकेल क्लार्कचे (नाबाद 125) शतक, स्टीव्हन स्मिथ (नाबाद 70) आणि सलामीवीर क्रिस रोर्जस (84) च्या अर्धशतकाच्या बळावर अँशेस मालिकेच्या तिसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 3 बाद 303 धावा अशी मजबूत स्थिती गाठली. कांगारूंच्या अद्याप सात विकेट शिल्लक असून या वेळी मोठी धावसंख्या उभारण्याचा पाहुण्यांचा प्रयत्न असेल.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वॉटसन आणि रोर्जस यांनी पहिल्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. मात्र, वॉटसन या वेळीसुद्धा आपल्या लौकिकानुसार खेळ करू शकला नाही. त्याला 19 धावांवर ब्रेसननने बाद करून इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. उस्मान ख्वाजा अवघ्या एका धावेवर तंबूत परतला. 82 धावांत ऑस्ट्रेलियाच्या दोन विकेट बाद झाल्या. संघाच्या 129 धावा झाल्या असताना रोर्जसला स्वानने बाद केले. त्याचे शतक थोडक्याने हुकले. रोर्जसने 114 चेंडूंचा सामना करताना 14 चौकारांच्या मदतीने 84 धावांची खेळी साकारली. दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी 208 चेंडूंत 17 चौकारांसह 125 धावा काढून क्लार्क खेळत होता. क्लार्क-स्मिथने 174 धावांची अभेद्य भागीदारी करून संघाचा डाव सावरला.